पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि नीलेश घायवळ या दोघांवर एम्.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई !

कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि गजा मारणे

पुणे, ७ एप्रिल – कुख्यात गुंड गजा मारणे आणि नीलेश घायवळ या दोघांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या एम्.पी.डी.ए. कारवाईला (महाराष्ट्रात घातक कृती रोखणे) राज्यशासनाने अनुमती दिली आहे. त्यानुसार गजा मारणे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात, तर नीलेश घायवळ याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात हालवण्यात आले आहे.

गजा मारणे याने तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर दळणवळण बंदीचे नियम मोडून पुण्यापर्यंत एक्सप्रेस वेवर मिरवणूक काढली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्याच्यावर एम्.पी.डी.ए. अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. तसेच घायवळवरही एम्.पी.डी.ए. नुसार कारवाई करून त्याला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. सामान्य जनतेस गुन्हेगारी टोळ्यांपासून त्रास असल्यास त्यांनी निर्भीडपणे पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.