फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे इतर कैद्यांच्या आरोग्याकडे लक्ष कधी देणार ? – हिंदु विधीज्ञ परिषद

फादर स्टॅन स्वामी यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे अटक केली होती. त्यांच्यावर नक्षलवादाला साहाय्य आणि अवैध कृत्ये केल्याचे गंभीर गुन्हे दाखल होते.

(म्हणे) ‘खोट्या आरोपाखाली मानवाधिकार कार्यकर्त्यांना कारागृहात टाकणे स्वीकारार्ह नाही !’

स्टॅन स्वामी हे ख्रिस्ती असल्यामुळे संयुक्त राष्ट्रे आणि पाश्‍चात्य देशांतील संघटना त्यांच्या नावाने अश्रू ढाळत आहेत, हेच यातून स्पष्ट होते !

इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झालेल्या आणि आता अफगाणिस्तानच्या कारागृहात असलेल्या केरळच्या ४ महिलांना भारत परत आणणार नाही !

त्यांचे पती तेथे वेगवेगळ्या आक्रमणात ठार झाले आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये या महिलांनी शरणागती पत्करली हाती.

नगर येथील रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र प्रविष्ट

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध ४५० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात प्रविष्ट करण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

चीनला शिनजियांग प्रांतातील उगूर मुसलमानांचे अस्तित्वच संपवायचे आहे ! – अहवाल

भारतातील मुसलमानांवर कथित अन्याय झाल्यावर गळे काढणारे पाक आणि जगातील अन्य इस्लामी राष्ट्रे आता चीनच्या या इस्लामविरोधी कृत्याविषयी गप्प का ? आता चीनविरुद्ध ते जिहाद का पुकारत नाहीत ?

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेंनी उपकारागृहातून भ्रमणभाषद्वारे अधिवक्त्यांशी संपर्क केल्याचे उघड

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे सध्या पारनेर उपकारागृहात असून तेथील २ कोठडीत सापडलेल्या भ्रमणभाषद्वारे त्यांनी काही अधिवक्त्यांशी संपर्क केल्याचे तपासात उघड झाले आहे.

नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार ३ कारागृह अधीक्षकांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद !

बंदीवानांकडून खंडणी घेणारे कारागृह अधीक्षक पोलीसदलात काम करण्याच्या पात्रतेचे नाहीत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? अशा घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास उडत चालला आहे !

उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याने १० सहस्र बंदीवानांना सरकार पॅरोलवर सोडणार !

सोडण्यात आलेले बंदीवान बाहेर जाऊन कोरोनाच्या काळात गुन्हेगारी कृत्य करणार नाहीत, यावर सरकारने लक्ष ठेवले पाहिजे !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन देण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना कारागृहात कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने जोधपूर येथील म. गांधी रुग्णालयात हालवण्यात आले आहे. यातून राजस्थान सरकारचा गलथानपणाच दिसून येतो.

कुख्यात गुंड छोटा राजन याच्या मृत्यूची अफवा

येथील तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड छोटा राजन याचा कोरोनामुळे एम्स रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला अशी अफवा ७ मे या दिवशी पसरली होती…..