१ कोटी १० लाख बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडण्याचे ध्येय
(डिटेन्शन सेंटर म्हणजे बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केलेल्या लोकांना ठराविक कालावधीसाठी ठेवण्यासाठी नियुक्त केलेली जागा)
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांना शोधून ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये ठेवण्यात येत आहे. प्रतिदिन १ सहस्र २०० स्थलांतरितांना येथे आणून ठेवले जात असल्याने हे सेंटर भरले आहे. त्यामुळे आता अशा बेकायदेशीर स्थलांतरितांना कारागृहात टाकले जात आहे. जवळपास १ कोटी १० लाख स्थलांतरितांना पकडून त्यांना त्यांच्या देशात नेऊन सोडण्यात येणार आहे.
१. ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स् एन्फोर्समेंट’च्या डिटेन्शन सेंटरमध्ये केवळ ४१ सहस्र लोकांना ठेवण्याची क्षमता आहे. या केंद्रांमध्ये अनुमाने २ सहस्र भारतीय आहेत.
२. डिटेन्शन सेंटर्स भरल्याने लॉस एंजेलिस, मियामी, अटलांटा आणि कॅन्सस यांसह ९ कारागृहांमध्ये इतर धोकादायक गुन्हेगारांसह बेकायदेशीर स्थलांतरितांना ठेवण्यात येत आहे. इतकेच नाही, तर ग्वांतानामो नौदल तळावरही अनेकांना ठेवण्यात आले आहे.
३. ‘अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन’च्या मते, कारागृहांमधील परिस्थिती भयावह आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना वेळेवर जेवण दिले जात नाही. त्यांना वाटण्यात येणारे अन्न शिळे आणि दुर्गंधीयुक्त आहे.
४. कडाक्याच्या हिवाळ्यात बेकायदेशीर स्थलांतरितांना थंड भूमीवर झोपावे लागते. कारागृहातील सर्वांत जीर्ण कोठडीत त्यांना डांबले जात आहे. दिवसभरात केवळ ३० मिनिटांसाठी स्थलांतरितांना कोठडीतून बाहेर काढले जाते.
संपादकीय भूमिकाभारतात बांगलादेशी घुसखोरांची संख्या ५ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. भारतापेक्षा जवळपास तिप्पट भूमी असलेली अमेरिका जर १ कोटी लोकांची हकालपट्टी करू शकते, तर भारत असे का करू शकत नाही ? |