उड्डाणपूल दुर्घटनेला उत्तरदायी कोण ? याचा अहवाल १५ दिवसांत सादर करा ! – उच्च न्यायालयाचा बांधकाम विभागाला आदेश

उड्डाणपुल कोसळल्याप्रकरणी चौकशीसाठी तज्ञांची समिती नेमल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. त्याची दखल घेत खंडपिठाने असे निर्देश दिले.

Threat To Journalist : पत्रकाराला धमकी दिल्याच्या प्रकरणी कणकवली (सिंधुदुर्ग) उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या विरोधात गुन्हा नोंद

भगवान सुरेश लोके यांनी ‘डॉ. आचरेकर यांच्यापासून जीवितास धोका पोचेल, अशा आशयाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Goa Bogus Beneficiaries : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील बनावट लाभार्थींना शोधून काढून त्यांना वगळणार

गरिबांसाठीच्या योजनांचा अपलाभ उठवणारे नागरिक पहाता समाजात अप्रामाणिकपणा किती आहे, ते लक्षात येते !

पदवीधर गटाच्‍या मतदार नोंदणी प्रक्रियेची ‘एस्.आय.टी.’च्‍या माध्‍यमातून चौकशी करावी ! – डॉ. मनीषा कायंदे, आमदार

मुंबई विद्यापिठाच्‍या नोंदणीकृत पदवीधर गटाच्‍या अधिसभा निवडणुकीसाठी यापूर्वी झालेल्‍या मतदार नोंदणी प्रक्रियेत पुष्‍कळ प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. त्‍यांची विशेष तपास पथकाद्वारे (‘एस्.आय.टी.’द्वारे) चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्‍या विधान परिषदेच्‍या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग : कलमठ येथील शिक्षिकेची ३८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक !

वाढदिवसासाठी भेट पाठवल्याचे सांगून एका शिक्षिकेची ३८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फातोर्डा (गोवा) येथे ईदच्या मिरवणुकीत हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने : पोलिसांकडून गुन्हा नोंद

हिंदूंनी केवळ गुन्हा नोंद झाल्याविषयी समाधान न मानता संबंधितांना अटक होऊन न्यायालय त्यांना दोषी ठरवेपर्यंत पाठपुरावा घ्यावा ! अशी प्रकरणे कालांतराने मिटवली जाण्याचीही शक्यता असते !

गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील मद्यतस्करीचे मूळ काणकोण येथे !

काणकोण (गोवा) येथील लिगोरियो डिसोझा हा आंतरराज्य मद्यतस्करीमध्ये विदेशी मद्य पुरवणारा एकमेव पुरवठादार आहे. गुजरात न्यायालयाने लिगोरियो डिसोझा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे भारत-पाक सामन्यात भारताचा विजय झाल्यावर फटाके फोडल्याने हिंसक विरोध !

ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याच्या नावाखाली होणारा हिंसाचार योग्य नाही. हिंसाचार करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे !

गोव्यातील खाण घोटाळ्याचे अन्वेषण करण्यास विशेष अन्वेषण पथकाला संमती

खाण घोटाळ्याचे अन्वेषण तब्बल १० वर्षे कासवाच्या गतीने चालू रहाणे लज्जास्पद !

गोवा : उसप, डिचोली येथे मंदिरात चोरी

मंदिराचे पुजारी सकाळी मंदिरात आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर देवस्थान समिती आणि पोलीस यांना याविषयी माहिती देण्यात आली. चोरट्यांनी दानपेटी फोडून आतील रक्कम काढून पेटी मंदिराच्या जवळ टाकून दिली होती.