सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून उपवडे येथील धोकादायक शाळेची पहाणी

प्रशासनाला आंदोलनाची आणि बहिष्काराची भाषाच समजते, असे पुन्हा या घटनेतून लक्षात येते ! असे सुस्त प्रशासन काय कामाचे ?

नवी मुंबईत पाणीटंचाई निर्माण करणार्‍या अधिकार्‍यांना घेराव घालणार ! – गणेश नाईक, आमदार

कुणाच्या तरी राजकीय दबावाखाली येऊन नवी मुंबई शहरामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणार्‍या महापालिकेच्या काही स्वार्थी अधिकार्‍यांना घेराव घालू, अशी चेतावणी भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी दिली आहे.

पालघर येथील शासकीय कामांचा निधी लाटल्याप्रकरणी १० अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

कामे झालेली नसतांना कोट्यवधींचा निधी लाटणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांकडून तो पैसा वसूल करून घ्यावा !

गोवा : ‘कीर्तीचक्र’ पुरस्कारप्राप्त  हुतात्मा नरेंद्र मयेकर यांच्या स्मारकावर ‘गोबी मंच्युरियन’ विक्रेत्याचे दुकान !

काही वर्षांपासून पोलीस रात्री आणि दिवसा चारचाकी वाहनाद्वारे सर्वत्र गस्त घालतात. त्यांना हे दिसले नाही का ? येथील नगरपालिका काय करत आहे ? जे गोवा फर्स्ट संघटनेला दिसते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का दिसत नाही ?

धाराशिव येथील मदरशामध्ये आढळले ३४ शाळाबाह्य विद्यार्थी !

मदरशामध्ये ८० मुली शिक्षण घेत असल्याची नोंद असतांना शिक्षण विभागाच्या पथकाला प्रत्यक्षात एकही मुलगी आढळली नाही. ३४ मधील १७ विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह नोव्हेंबर मासात अयोध्येला जाणार

एकनाथ शिंदे हे नोव्हेंबर मासात अयोध्या येथे जाऊन प्रभु श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. या वेळी त्यांच्या पक्षाचे सर्व आमदारही त्यांच्यासमवेत असणार आहेत.

कल्याण-डोंबिवली येथे विनाअनुमती उभारलेल्या फटाक्यांच्या दुकानांवरील कारवाई थंड !

उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, कायदे आणि नियम यांचे उल्लंघन होत असतांनाही प्रशासन आणि पोलीस यांच्याकडूनही बघ्याची भूमिका घेतली जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सातारा परिवहन कार्यालयाकडून मनमानी भाडे आकारणार्‍या १३१ बसगाड्यांवर कारवाई

१ लाख २६ सहस्र रुपयांची दंड आकारणी

पुणे येथील अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्रावर गुन्हा नोंद करण्यास पोलिसांची टाळाटाळ !

गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! अशा पोलिसांमुळेच जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास उडाला आहे !

‘हलाल सर्टिफिकेशन’ देणार्‍या संस्थांची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी करा ! – निवेदनातील मागणी

राष्ट्रासाठी अतिशय गंभीर संकट निर्माण करणार्‍या ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात कार्यवाही, तसेच ‘हलाल सर्टिफिकेशन’ देणार्‍या संस्थांचे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अन्वेषण, या मागण्यांसाठी वाराणसी येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले.