सनातन संस्थेच्या वतीने नोएडा (उत्तरप्रदेश) येथे पितृपक्षानिमित्त प्रवचन पार पडले !

नोएडा (उत्तरप्रदेश) – पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने आपल्या पूर्वजांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणे सोपे जाते. श्राद्धामुळे पूर्वजांच्या इच्छा तृप्त होऊन त्यांना सद्गती मिळते. त्यामुळे श्राद्धविधी ही हिंदु धर्माच्या आचारधर्माची एक महत्त्वपूर्ण धार्मिक कृती आहे, तसेच याला वेदकाळापासून आधार प्राप्त आहे. पितृपक्षाच्या कालावधीत एक दिवस श्राद्ध केल्याने संपूर्ण वर्षासाठी आपले पूर्वज तृप्त रहातात. त्यामुळे श्राद्धविधी करा; कारण की श्राद्ध हीच श्रद्धा आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या राजरानी माहूर यांनी ग्रेटर नोएडाच्या अरिहंत अबोड सोसायटीमध्ये आयोजित प्रवचनात केले.

सनातन संस्थेच्या वतीने अशाच प्रकारचे प्रवचन ग्रेटर नोएडाच्या अजनाररा होम्स सोसायटी, पंचशील ग्रीन्स-१, तसेच सूरजपूरमध्ये आणि फरिदाबाच्या सेक्टर-२२ येथील मंदिरात अन् जिज्ञासूंच्या घरी आयोजित केले होते. या प्रवचनांचा, तसेच या वेळी लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.

क्षणचित्रे

१. अनेक जिज्ञासूंनी सांगितले की, श्राद्धाविषयीची माहिती आम्हाला ठाऊक नव्हती. त्यामुळे या विधीविषयी पुष्कळ शिकायला मिळाले.

२. एक जिज्ञासू म्हणाल्या की, प्रवचन ऐकून पुष्कळ चांगले वाटले. असे प्रवचन घेण्यासाठी नियमित येत रहा.