‘नमामि चंद्रभागा’ योजनेचा पाठपुरावा करणार ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

सोलापूर येथील पत्रकार परिषदेत माहिती

डॉ. नीलम गोर्‍हे

सोलापूर, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाचा ‘नमामि चंद्रभागा’ हा प्रकल्प निधीच्या कमतरतेमुळे मागे पडला आहे. त्यासंदर्भात एक स्वतंत्र बैठक घेऊन त्याचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना दिली. या वेळी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रभागा नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी नदीचे पुनरुज्जीवन करून तिचे ऐतिहासिक महत्त्व पुनर्संचयित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर २०२१ मध्ये हा प्रकल्प चालू केला आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी वारकर्‍यांसाठी रहाण्याची सोय करण्याच्या संदर्भात प्रयत्न चालू आहेत, तसेच काही दिवसांपूर्वी पंढरपूर विठ्ठल मंदिरात टोकन पद्धतीने दर्शनाला प्रारंभ करण्यात आला आहे. त्याला भाविक आणि मंदिर प्रशासनाचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी ५ विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची क्षमता आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत ५ जागांवर शिवसेना दावा करणार आहे. – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद