सातारा स्फोटाचे धागेदोरे सोलापूरपर्यंत
सातारा – येथील माची पेठेत अदालत वाड्याजवळ असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये २ ऑक्टोबर या दिवशी भर दुपारी भीषण स्फोट झाला होता. हा स्फोट झाल्यानंतर ३ कि.मी. परिसर अक्षरश: हादरून गेला होता. यामुळे स्फोटकामध्ये नेमके कोणते घटक होते ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या स्फोट प्रकरणाचे धागेदोरे बार्शीपर्यंत (जिल्हा सोलापूर) निघाले असून तेथील दोघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात त्यांना उपस्थित केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आतापर्यंत चौघांना अटक झाली असून या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार असून पोलिसांचे धाडसत्र चालू रहाणार आहे. शोएब मणियार, अकिब पिंजारी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी आरंभी सातार्यातील दोघांना अटक केली. दोघा संशयितांचे अन्वेषण चालू असतांना त्यांच्याकडून बार्शी येथील धागेदोरे समोर आले. सातारा शहर पोलिसांनी बार्शीत जाऊन दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली असता यातील एकाकडे फटाके विक्रीचा परवाना आहे. दुसरा मात्र चालक आहे. या दोघांनी मिळून सातार्यात स्फोटात मृत्यू झालेल्या मुजमीन याला फटाके बनवणारी शोभेची दारू दिल्याचे समोर येत आहे. या तिघांमध्ये अधिकोषाचे व्यवहारही झाले आहेत.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रात होणार्या स्फोटांच्या मागे धर्मांधांचे आगामी काळात काही घातपात घडवण्याचे षड्यंत्र आहे का ? हे पहाणे आवश्यक ! गुन्हेगारी, घातपाती कारवायांमध्ये धर्मांधांचा वाढता सहभाग ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करते ! |