अकोला – येथील हरिहर पेठ भागात रिक्शा आणि सायकलस्वार यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. या वेळी दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या वेळी ४ दुचाक्यांची जाळपोळही केली गेली. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दगडफेक करण्यात आल्याने रस्त्यावर सर्वत्र दगडांचाच खच पडलेला दिसत होता.
१३ मे २०२३ या दिवशीही याच हरिहर पेठ भागात मोठी दंगल झाली होती. यात एकाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या परिसरात वारंवार तेढ निर्माण होते; पण प्रत्येक वेळी त्या समस्या सामंजस्याने सोडवल्या जातात. ७ ऑक्टोबर या दिवशी समस्येचे पर्यवसान दगडफेकीत झाले.