काश्मीरचे रईस खान आणि रिझवान यांच्यावर आरोप !
शिमला (हिमाचल प्रदेश) – येथील अवैध मशिदींविषयीचा वाद अजून संपलेला नसून आता येथील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना गोमांस खाऊ घातल्याच्या आरोपामुळे वातावरण अधिकच तापले आहे. ५ ऑक्टोबरला प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते कमल गौतम यांनी ‘एक्स’द्वारे २ व्हिडिओ प्रसारित केल्यावर हे प्रकरण समोर आले. शिमल्यातील ‘होम स्टे राज व्हिला’ हॉटेलमध्ये नवरात्रीच्या कालावधीत गोमांस शिजवून खाल्ल्याचा दावा त्यांनी केला. मुसलमान समुदायातील रईस खान आणि रिझवान या व्यक्ती तेथे कर्मचारी असून त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. हे दोघे काश्मीरचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवरून हिंदु संघटना संतप्त झाल्या आहेत. वाढत असलेला विरोध पाहून रईस आणि रिझवान यांना हॉटेल मालकाने नोकरीवरून काढले आहे.
कमल गौतम यांनी सांगितलेले की, हॉटेल ‘होम स्टे राज व्हिला’ हे शिमल्याच्या जुन्या बस स्थानकाजवळ आहे. या हॉटेलमधील एका हिंदु कर्मचार्याने पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. मुसलमान समाजातील काही लोक हॉटेलमध्ये गोमांस आणून खातात, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंमधील अतीसहिष्णु वृत्तीचाच हा परिणाम होय ! |