सातारा, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करून पारदर्शी आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी काम करा, असे निर्देश राज्याचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणूक सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते.
चोक्कलिंगम पुढे म्हणाले की, ज्या मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का राज्याच्या सरासरी मतदानाच्या टक्क्यांहून अल्प आहे, त्या ठिकाणची कारणे शोधून त्यावर मार्ग काढावा, जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल.
संपादकीय भूमिकाअसे आदेश का द्यावे लागतात ? यावरून सध्याच्या निवडणुकांची स्थिती लक्षात येत नाही का ? |