मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह नोव्हेंबर मासात अयोध्येला जाणार

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नोव्हेंबर मासात अयोध्या येथे जाऊन प्रभु श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. या वेळी त्यांच्या पक्षाचे सर्व आमदारही त्यांच्यासमवेत असणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच अयोध्येतला जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यापूर्वी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यासमवेत अयोध्येत गेले होते.