US Appeal Bangladesh To Protect Minorities : बांगलादेशाने तेथील अल्‍पसंख्‍यांकांच्‍या हक्‍कांचे संरक्षण करावे !

अमेरिकेचे बांगलादेशाला तोंडदेखले आवाहन

अमेरिकेच्‍या परराष्‍ट्र विभागाचे प्रवक्‍ते मॅथ्‍यू मिलर

वॉशिंग्‍टन (अमेरिका)- अमेरिकेने बांगलादेशाला तेथील अल्‍पसंख्‍य समुदायांच्‍या हक्‍कांचे संरक्षण करण्‍याचे आवाहन केले आहे. बांगलादेशाच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्‍यागपत्र दिल्‍यानंतर बांगलादेशात अल्‍पसंख्‍य हिंदु समुदायावरील वाढत्‍या आक्रमणांच्‍या पार्श्‍वभूमीवर हे आवाहन करण्‍यात आले आहे.

अमेरिकेच्‍या परराष्‍ट्र विभागाचे प्रवक्‍ते मॅथ्‍यू मिलर यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘आम्‍ही जगभरात करतो, तसे बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांकांच्‍या हक्‍कांचे संरक्षण करू इच्‍छितो.’ हिंदु त्‍यांचा सर्वांत मोठा सण असणारा नवरात्रोत्‍सव साजरा करत असतांना काही धर्मांध मुसलमानांमुळे हिंदु समुदायाला निर्माण झालेल्‍या धोक्‍याच्‍या संदर्भात विचारण्‍यात आलेल्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना मॅथ्‍यू मिलर यांनी वरील विचार मांडले.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात मागील २ महिन्‍यांपेक्षा अधिक काळ इस्‍लामी कट्टरतावादी तेथील हिंदूंना लक्ष्य करत आहेत; मात्र अमेरिकेने याविषयी चकार शब्‍दही काढला नाही. आता ‘आम्‍ही याची नोंद घेत आहोत’, हे जगाला दाखवण्‍यासाठी अमेरिका असे वक्‍तव्‍य करत आहे, हे हिंदू जाणून आहेत !