‘होमिओपॅथी’ या चिकित्सापद्धतीचा शोध लावणारे जर्मनी येथील डॉ. सॅम्युएल हानेमान आणि ‘होमिओपॅथी’ची मूलभूत तत्त्वे !
‘समानलक्षण योजना’ हे होमिओपॅथीचे मूळ तत्त्व आहे, म्हणजे एखादा पदार्थ खाण्यात आल्यानंतर जी काही लक्षणे उद्भवतील, तशीच लक्षणे अन्य कोणत्याही कारणांमुळे रुग्णामध्ये उद्भवली असतील, त्या वेळी ‘तो पदार्थ औषध म्हणून देणे’, याला ‘समलक्षण योजना’, असे म्हटले आहे.