मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती

‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक २२) !

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

२९ सप्टेंबर या दिवशीपासून आपण प्रत्यक्ष आजारावरील स्वउपचार समजून घेत आहोत. २९ डिसेंबर २०२३ या दिवशीपासून आपण ‘मासिक पाळीशी संबंधित तक्रारीं’वरील औषधांची माहिती देत आहोत. या अंतर्गत ‘मासिक पाळीच्या आधी असलेल्या तक्रारी, मासिक पाळीच्या पूर्वी अन् चालू असतांना असलेल्या तक्रारी आणि मासिक पाळी चालू असतांना असलेल्या तक्रारी’, यांविषयीची माहिती २९ डिसेंबर या दिवशी वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत. ‘प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांतील ‘होमिओपॅथी स्वउपचारांच्या संदर्भातील सूत्रे’ वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !    

संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

मासिक पाळीशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारींना स्त्रियांना सामोरे जावे लागते. यातील काही प्रमुख तक्रारींच्या उपचारांच्या संदर्भातील माहिती पुढे दिली आहे. कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.

४. मासिक पाळीच्या आधी किंवा दोन पाळ्यांच्या मधील कालावधीत स्त्रियांच्या पोटात दुखणे (Dysmenorrhoea)

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

काही स्त्रियांना मासिक पाळी चालू व्हायच्या १-२ दिवस आधी पोटात दुखू लागते आणि पाळी चालू झाल्यावर २-३ दिवसांनी ते आपोआप थांबते. या कालावधीत पोटात पेटके (cramps) येतात. काहींना मळमळ, थकवा किंवा जुलाब होतात. मासिक पाळीच्या वेळी सामान्यतः आढळणारे पोटात दुखणे, हे कोणत्याही वैद्यकीय आजारामुळे नसते.

४ अ. कॉलोफायलम् थॅलिकट्रॉयडेस (Caulophyllum Thalictroides)

४ अ १. पोटामध्ये मधून मधून तीव्र कळा येणे

४ अ २. आतडी खाली येत आहे, असे वाटणे

४ अ ३. वेदना गर्भाशयाकडून भोवतालच्या इतर इंद्रियांकडे जाणे

४ आ. कॅमोमिल्ला (Chamomilla)

डॉ. अजित भरमगुडे

४ आ १. अतिशय तीव्र अशा प्रसुतीप्रमाणे वेदना होणे

४ आ २. वेदना सहन न होणे, वेदनेच्या बरोबर बधिरता जाणवणे

४ आ ३. पोटाच्या वरच्या बाजूला दाब जाणवून अंगावर रक्ताच्या गाठी पडणे.

Discharge per vagina याला मराठीत ‘अंगावर जाणे’, असे म्हणतात, उदाहरणार्थ मासिक पाळीच्या वेळी पुष्कळ रक्तस्राव होत असल्यास ‘अंगावर पुष्कळ जात आहे’, असे म्हणतात.

४ आ ४. उष्ण हवामानामध्ये त्रासात वाढ होणे

४ इ. पल्सेटिल्ला निग्रिकन्स (Pulsatilla Nigricans)

४ इ १. कळा काही वेळा एका भागामध्ये, तर लगेचच दुसर्‍या भागामध्ये जाणवणे

४ इ २. वेदनांबरोबर थंडी वाजणे; जेवढ्या अधिक वेदना, तेवढी अधिक थंडी वाजणे

४ इ ३. मासिक पाळी उशिरा येणे किंवा दबली जाणे, मुख्यत्वे पाय ओले केल्याने रक्तस्राव बंद होणे

४ इ ४. मासिक पाळीच्या वेळी वेदना होऊन फार थोडे अंगावर जाणे आणि त्या वेळी जुलाब होणे

४ इ ५. स्त्री ‘कोमल, मृदु, नमते घेणारी, दुःखी, निराश, लवकर रडू येणारी, प्रत्येक वेळी रडणारी, प्रत्येक तक्रार रडत सांगणारी’, अशी असणे

४ इ ६. वेदना, थंडी, शौच इत्यादींच्या लक्षणांच्या स्वरूपांमध्ये सतत पालट होणे

४ इ ७. इतरांनी सहानभूती दाखवावी, असे वाटणे

४ ई. मॅग्नेशियम फॉस्फोरिकम् (Magnesium Phosphoricum)

पोटामध्ये वेदना होणे

४ ई १. पाळीचा स्राव चालू होण्यापूर्वी मज्जातंतूगत (neuralgic) वेदना होणे, तसेच पेटके (cramps) येणे

४ ई २. पोटामध्ये प्रामुख्याने उजव्या बाजूला वेदना होणे

४ ई ३. शेकल्याने, पुढे वाकल्याने आणि दाब दिल्याने बरे वाटणे. हालचाल केल्याने वेदनांमध्ये वाढ होणे

४ ई ४. कंटाळलेल्या, सुस्त आणि थकलेल्या स्त्रियांमध्ये पाळीचा त्रास असल्यास उपयुक्त

४ उ. ॲकोनाईट नॅपेलस (Aconite Napellus)

४ उ १. धडधाकट, गुलाबी चेहरा (plethoric) असलेल्या स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळी असह्य वेदना होणे

४ उ २. अचानक भीती वाटून अस्वस्थ होणे, काळजी वाटणे

४ उ ३. मरणाची भीती वाटणे, मृत्यूची नेमकी वेळही सांगणे

४ ऊ. कॅक्टस ग्रँडिफ्लोरस् (Cactus Grandiflorus)

४ ऊ १. पोटामध्ये अतिशय भयानक वेदना होणे

४ ऊ २. वेदनांमुळे रुग्ण मोठ्याने रडणे

४ ऊ ३. रुग्ण पुरते गळून जाणे

४ ए. कोलोसिंथिस (Colocynthis)

४ ए १. पोटामध्ये भयंकर कळा येणे, आतडी दगडाखाली चेचल्या गेल्या आहेत, असे वाटणे

४ ए २. वेदनांमुळे अगदी वाकून जायला होणे

४ ए ३. रुग्ण तळमळून विव्हळत असणे

४ ए ४. रुग्णाला पोट हातांनी दाबून धरून वाकले असता बरे वाटणे

४ ऐ. व्हायबरनम् ऑप्यूलस (Viburnum Opulus)

४ ऐ १. मधून मधून पोटामध्ये कळा येणे, त्याबरोबर पोटामध्ये पेटके (cramps) येणे

४ ऐ २. वेदनांबरोबर पोटामध्ये वायू होऊन मोठे ढेकर येणे

४ ओ. सेपिया ऑफिसिनॅलिस (Sepia Officinalis)

४ ओ १. गर्भाशय खाली ओढल्याप्रमाणे जाणवणे

४ ओ २. सर्व अवयव योनीतून बाहेर येत आहेत की काय, असे वाटणे आणि त्यामुळे कात्रीप्रमाणे पायावर पाय घालून बसणे किंवा तो भाग हाताने धरून ठेवणे भाग पडणे

४ ओ ३. मासिक स्राव अतिशय अल्प असणे

४ औ. ब्रायोनिआ (Bryonia)

४ औ १. मासिक पाळीच्या वेळी मासिक स्रावाच्या ऐवजी नाकातून रक्तस्राव होणे
(क्रमशः पुढच्या शुक्रवारी)

 ‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील.