‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक २३) !
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
२९ सप्टेंबर या दिवशीपासून आपण प्रत्यक्ष आजारावरील स्वउपचार समजून घेत आहोत. त्या अंतर्गत २९ डिसेंबर २०२३ या दिवशीपासून आपण ‘मासिक पाळीशी संबंधित तक्रारीं’वरील औषधांची माहिती देत आहोत. ५ जानेवारी या दिवशी या अंतर्गत ‘मासिक पाळीच्या आधी असलेल्या तक्रारी, मासिक पाळी चालू असतांना असलेल्या तक्रारी आणि मासिक पाळीच्या आधी किंवा दोन पाळ्यांच्या मधील कालावधीत स्त्रियांच्या पोटात दुखणे’, यांविषयी माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत. ‘प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांतील ‘होमिओपॅथी स्वउपचारांच्या संदर्भातील सूत्रे’ वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !
संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे
मासिक पाळीशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारींना स्त्रियांना सामोरे जावे लागते. यातील काही प्रमुख तक्रारींच्या उपचारांच्या संदर्भातील माहिती पुढे दिली आहे. कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.
५. मासिक स्राव अधिक असणे (Menorrhagia)
काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी अधिक प्रमाणात आणि अधिक दिवस योनीमार्गातून रक्तस्राव होतो. ७ दिवसांपेक्षा अधिक आणि नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात रक्तस्राव होणे, याला ‘मासिक स्राव अधिक असणे’, असे म्हणतात. मासिक स्राव अधिक होत असल्यास निर्जलीकरण रोखण्यासाठी ‘जलसंजीवनी’ (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ओ.आर्.एस्.)) द्यावे. जलसंजीवनी, हे पाणी आणि ‘इलेक्ट्रोलाईट’ यांचे मिश्रण आहे. बाजारात ‘ओ.आर्.एस्.’ची सिद्ध पाकिटे मिळतात; परंतु ती उपलब्ध नसल्यास उकळून थंड केलेल्या १ लिटर पाण्यामध्ये ६ चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ मिसळून आपण ‘जलसंजीवनी’ द्रावण सिद्ध करू शकतो. अधिक रक्तस्राव झाल्यामुळे पंडुरोग (anaemia) होऊन थकवा येऊ शकतो. अशा वेळी रक्तवाढीसाठी लोहाच्या गोळ्या (iron tablets) घेणे आवश्यक असते.
५ अ. बोरॅक्स (Borax)
५ अ १. मासिक स्राव अपेक्षित वेळेच्या पुष्कळ अगोदर चालू होऊन त्याचे प्रमाण पुष्कळ जास्त असणे
५ अ २. मासिक स्रावासह पोटामध्ये कळा येऊन मळमळणे
५ आ. कल्केरिया कार्बाेनिकम् (Calcarea Carbonicum)
५ आ १. मासिक पाळी अपेक्षित वेळेच्या पुष्कळ अगोदर चालू होणे, स्रावाचे प्रमाण पुष्कळ अधिक असणे आणि स्राव अनेक दिवस चालू रहाणे
५ आ २. रुग्ण स्थूल; परंतु निस्तेज (pale) असणे
५ आ ३. पाय ओलसर आणि थंडगार पडणे
५ इ. एलो सोकोट्रिना (Aloe Socotrina)
५ इ १. मासिक पाळी अपेक्षित वेळेच्या पुष्कळ अगोदर चालू होणे, स्रावाचे प्रमाण पुष्कळ अधिक असणे आणि स्राव अनेक दिवस चालू रहाणे
५ इ २. प्रसूतीच्या वेळी होतात त्याप्रमाणे खालच्या दिशेने ढकलल्याप्रमाणे कळा येऊन गर्भाशय योनीमार्गातून बाहेर येणे
५ इ ३. शौचाला घाई होणे
५ ई. फेरम् मेटॅलिकम् (Ferrum Metalicum) : अन्य काहीही लक्षण नसतांना केवळ मासिक पाळीच्या स्रावाचे प्रमाण अधिक असणे
५ उ. हॅमॅमेलिस (Hamamelis)
५ उ १. मासिक स्राव अधिक असणे
५ उ २. मासिक स्रावाचा रंग गडद असणे
५ उ ३. विशेषतः जर सोबत अंडाशयात वेदना असणे (pain in ovaries)
५ ऊ. चायना ऑफिसिनॅलिस (China Officinalis) : मासिक स्राव अधिक होणे, स्रावामध्ये काळसर गाठी असणे
५ ए. क्रॉकस सटायव्हस (Crocus Sativus) : मासिक स्राव काळा, दाट, जळू प्रमाणे असणे
५ ऐ. थॅलॅप्सी बर्सा पास्टोरिस (Thlapsi Bursa Pastoris)
५ ऐ १. मासिक स्राव पुष्कळ होणे
५ ऐ २. सोबत गाठी पडणे आणि पोटात कळा येणे
५ ऐ ३. दोन मासिक पाळ्यांमध्येही अशक्तपणा भरून न येणे
५ ओ. कॅमोमिल्ला (Chamomilla)
५ ओ १. मनःक्षोभामुळे अतीप्रमाणात मासिक स्राव होणे, त्याबरोबर पुष्कळ चिडचिड होणे
५ ओ २. स्राव गाठी असलेला आणि काळ्या रंगाचा असणे
५ औ. सिकेल कॉरन्युटम् (Secale Cornutum)
५ औ १. मासिक स्राव गडद, रक्त आणि पू मिश्रित, तसेच पातळ असणे
५ औ २. रुग्ण स्त्री ‘कृश आणि वाळलेली’ (thin and cachectic) असणे
५ अं. मॅग्नेशियम कार्बाेनिकम् (Magnesium Carbonicum)
५ अं १. मासिक स्राव पुष्कळ अधिक आणि प्रामुख्याने रात्री अधिक प्रमाणात असणे
५ क. सबिना ऑफिसिनॅलिस (Sabina Officinalis)
५ क १. मासिक स्राव भडक लाल रंगाचा, पुष्कळ आणि मधून मधून होणे
५ क २. चालतांना किंवा उभे असतांना स्राव वाढणे
५ ख. इपिकॅकुआन्हा (Ipecacuanha)
५ ख १. मासिक स्राव पुष्कळ प्रमाणात आणि भडक लाल रंगाचा असणे
५ ख २. या लक्षणासोबत मळमळ असणे किंवा नसणे
५ ग. नायट्रिकम् ॲसिडम् (Nitricum Acidum)
५ ग १. गर्भपातानंतर किंवा मासिक पाळीच्या वेळी पोटामध्ये कळा येऊन पुष्कळ प्रमाणात स्राव होणे
५ ग २. रजोनिवृत्तीच्या (menopause च्या) काळामध्ये ओटीपोटामध्ये खाली ओढल्याप्रमाणे कळा येऊन पाठ, तसेच मांड्यांमध्ये वेदना होणे
५ ग ३. घोड्याच्या मूत्राप्रमाणे लघवीला दुर्गंध येणे
५ ग ४. मध्यरात्रीनंतर अस्वस्थ होणे
५ ग ५. तीव्र पेटके (cramps) येऊन खाली ओढल्याप्रमाणे कळा येणे, त्यानंतर लगेच स्राव होणे
५ ग ६. हिरव्या रंगाचा जळजळणारा श्वेतपदर अंगावरून जाणे (Discharge per vagina याला मराठीत ‘अंगावरून जाणे’, असे म्हणतात, उदा. मासिक पाळीच्या वेळी पुष्कळ रक्तस्राव होत असल्यास ‘अंगावरून पुष्कळ जात आहे’, असे म्हणतात. श्वेतपदर, म्हणजे White discharge per vagina)
५ घ. आर्सेनिकम् आल्बम् (Arsenicum Album)
५ घ १. पुष्कळ काळापासून मासिक स्राव अधिक असणे
५ घ २. पातळ, जळजळणारा श्वेतपदर अंगावरून जाणे
५ च. अँब्रा ग्रिसीया (Ambra Grisea) : मासिक पाळीच्या नंतरही छोट्या छोट्या कारणाने रक्तस्राव होणे
५ छ. युस्टिलॅगो मेडिस (Ustilago Maydis) : मासिक पाळीच्या वेळी पुष्कळ स्राव होणे; त्याआधी आणि त्यानंतर ‘सामान्य रक्तस्राव’ (non-menstrual blood) होणे
(क्रमशः पुढच्या शुक्रवारी)
‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील. |