मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती

‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’

(लेखांक २४) !

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.२९ सप्टेंबर या दिवशीपासून आपण प्रत्यक्ष आजारावरील स्वउपचार समजून घेत आहोत. त्या अंतर्गत २९ डिसेंबर २०२३ या दिवशीपासून आपण ‘मासिक पाळीशी संबंधित तक्रारीं’वरील औषधांची माहिती देत आहोत. आतापर्यंत आपण ‘मासिक पाळीच्या आधी असलेल्या तक्रारी, मासिक पाळी चालू असतांना असलेल्या तक्रारी, मासिक पाळीच्या आधी किंवा दोन पाळ्यांच्या मधील कालावधीत स्त्रियांच्या पोटात दुखणे आणि मासिक स्राव अधिक असणे’, यांविषयी माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत. ‘प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांतील ‘होमिओपॅथी स्वउपचारांच्या संदर्भातील सूत्रे’ वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !   

संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

होमियोपेथी- औषधी (प्रतिकात्मक छायाचित्र)

मासिक पाळीशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारींना स्त्रियांना सामोरे जावे लागते. यातील काही प्रमुख तक्रारींच्या उपचारांच्या संदर्भातील माहिती पुढे दिली आहे. कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.

६. मासिक पाळी उशिरा येऊन अल्प रक्तस्राव होणे (Menses delayed and scanty)

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

६ अ. पल्सेटिला निग्रिकन्स (Pulsatilla Nigricans)

६ अ १. मासिक पाळी उशिरा येणे, सदोष (defective) आणि अनियमित असणे
६ अ २. रुग्ण निस्तेज (pale), निरुत्साही असणे
६ अ ३. थंडी वाजणे, डोकेदुखी असणे

६ आ. सल्फर (Sulphur)

६ आ १. मासिक पाळी नेहमी उशिरा येणे
६ आ २. बद्धकोष्ठता
६ आ ३. त्वचेवर पुटकुळ्या येण्याची प्रवृत्ती, तसेच त्वचा लालसर असणे (flushings)
६ आ ४. दुपारी भूक लागून अशक्तपणा जाणवणे

६ इ. ग्रॅफायटीस (Graphites)

६ इ १. मासिक पाळी उशिरा येणे
६ इ २. मासिक पाळी येण्यापूर्वी योनीमार्गाला खाज सुटणे

६ ई. नेट्रम् म्युरियाटिकम् (Natrum Muriaticum)

डॉ. अजित भरमगुडे

६ ई १. मासिक स्राव अल्प होणे
६ ई २. बद्धकोष्ठता

६ उ. मॅग्नेशियम कार्बाेनिकम् (Magnesium Carbonicum)

६ उ १. मासिक पाळी उशिरा येणे
६ उ २. मासिक स्राव अल्प आणि डांबराप्रमाणे असणे

७. मासिक पाळी न येणे (Amenorrhoea)

(रजोनिवृत्तीच्या (Menopause च्या) आधी आणि गर्भधारणा नसतांना) ‘गरोदर असतांना, बाळाला स्तनपान करतांना आणि रजोनिवृत्ती नंतर’ मासिक पाळी बंद होणे नैसर्गिक अन् अपेक्षित असते. याच्या व्यतिरिक्त एकापेक्षा अधिक मास मासिक पाळी न येणे, हे अनैसर्गिक आहे आणि त्याबद्दल सतर्क असणे आवश्यक असते. जर वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत मासिक पाळी आलीच नाही, तर त्याचे कारण आवश्यक संप्रेरकांचा असमतोल (hormonal imbalance) हे असू शकते. याबद्दल तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. मासिक पाळी नियमित चालू झाल्यानंतर (उपरोल्लेखित गरोदरपणा, स्तनपान, रजोनिवृत्ती वगळता) ३ किंवा अधिक मास मासिक पाळी न आल्यास त्याची कारणे – ताणामुळे निर्माण झालेला संप्रेरकांचा असमतोल, गर्भनिरोधक गोळ्या चालू असणे, उदासीनतेवरील औषधे चालू असणे, गर्भाशयातील रचनात्मक बिघाड (structural problems) इत्यादी असू शकतात. मासिक पाळी बंद झाल्यास स्त्रीला मानसिक ताण, स्तनातून अकारण दूध पाझरणे, केस गळणे, चेहर्‍यावर तारुण्य पिटिका (acne) येणे, डोकेदुखी, हाडे ठिसूळ होणे, गर्भधारणा न होणे, अशी लक्षणे दिसतात.

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

७ अ. पल्सेटिला निग्रिकन्स (Pulsatilla Nigricans)

७ अ १. शरिराचा किंवा प्रजननाशी संबंधित कोणताही आजार नसतांना यौवन अवस्थेत आल्यावर (puberty च्या वेळी) मासिक पाळी चालू न होणे
७ अ २. कोमल स्वभावाच्या, नमते घेणार्‍या, इतरांच्या विचारांनी लवकर प्रभावित होणार्‍या स्त्रियांना हे औषध उपयोगी पडते
७ अ ३. मोकळ्या हवामानामध्ये बरे वाटणे

७ आ. सायक्लमेन (Cyclamen)

७ आ १. मोकळ्या हवामानामध्ये बरे वाटणे
७ आ २. चक्कर येणे, डोकेदुखी, तसेच दृष्टीच्या संदर्भात तक्रारी असणे

७ इ. सल्फर (Sulphur)

७ इ १. मासिक पाळी अपेक्षित असलेल्या वेळी मासिक स्राव चालू न झाल्यास सकाळी ११ वाजता ‘पोटामध्ये खड्डा पडणे’ (sinking sensation)
७ इ २. अंगाची आग होऊन डोके गरम होणे, हातपाय थंड पडणे

७ ई. नेट्रम् म्युरियाटिकम् (Natrum Muriaticum)

७ ई १. मासिक पाळी न येणे आणि सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखी चालू होणे
७ ई २. थंडी वाजणे, उदासीनता, बद्धकोष्ठता असणे

(क्रमशः पुढच्या शुक्रवारी)

‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील.