डोकेदुखीवर (Headache) होमिओपॅथी औषधांची माहिती

‘घरच्‍या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक २८)

प्रतिकात्मक छायाचित्रं

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्‍ठता, आम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्‍यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

२९ सप्‍टेंबर २०२३ या दिवशीपासून आपण प्रत्‍यक्ष आजारावरील स्‍वउपचार समजून घेत आहोत. त्‍या अंतर्गत १६ फेब्रुवारी या दिवशीपासून आपण ‘डोकेदुखी’वरील (Headache) औषधांची माहिती घेत आहोत. आज या विकाराचा अंतिम भाग येथे देत आहोत. ‘प्रत्‍यक्ष आजारांवर स्‍वउपचार चालू करण्‍यापूर्वी २५ ऑगस्‍ट, १ आणि ८ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झालेल्‍या लेखांतील ‘होमिओपॅथी स्‍वउपचारांच्‍या संदर्भातील सूत्रे’ वाचून समजून घ्‍यावीत आणि त्‍यानुसार प्रत्‍यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !     

संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

यापूर्वीचा लेख वाचण्याकरिता येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/765102.html

१२. सल्‍फर (Sulphur)

१२ अ. डोके वरील किंवा मागील भागात ठुसठुसल्‍याप्रमाणे (throbbing) किंवा आवळल्‍याप्रमाणे दुखणे

१२ आ. डोक्‍याच्‍या टाळूवर जळजळ होणे. ती रात्री अंथरुणात असतांना वाढणे

१२ इ. सकाळी उठल्‍यावर, डोके दाबल्‍यावर डोकेदुखी कमी होणे

१२ ई. रक्‍ताचा प्रवाह डोक्‍यात जोरात जात असल्‍याप्रमाणे वाटणे

१२ उ. प्रत्‍येक सप्‍ताहात एकदा डोके दुखणे

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

१३. इग्‍नेेशिया अमारा (Ignatia Amara)

१३ अ. ठराविक ठिकाणी आवळल्‍याप्रमाणे डोके दुखणे

१३ आ. कपाळाच्‍या मध्‍यभागी, तसेच नाकाच्‍या मुळाशी, म्‍हणजे नाकाचा कपाळाला टेकलेला भाग येथे दाब जाणवणे

१३ इ. चिंता, काळजी किंवा शोक यांमुळे उद़्‍भवणारी डोकेदुखी

१४. लॅचेसिस म्‍युटस (Lachesis Mutus)

१४ अ. स्‍त्रियांंमध्‍ये रजोनिवृत्तीच्‍या (menopause) नंतर होणारी डोकेदुखी, ज्‍यात टाळूवर आग होते

१४ आ. डाव्‍या बाजूचे डोके पुष्‍कळ दुखणे, त्‍या वेळी चेहरा फिकट पडणे

१४ इ. झोपून उठल्‍यानंतर डोकेदुखी वाढणे

१५. सिलिशिया (Silicea)

१५ अ. डोकेदुखीचा जुनाट आजार असणे, त्‍यासह ‘दाब, गोंधळ, हालचाल आणि प्रकाश’ सहन न होणे

१५ आ. डोक्‍याभोवती शाल गुंडाळल्‍याने, दाब दिल्‍याने, डोकेदुखी तात्‍पुरती न्‍यून होणे

१५ इ. अतीश्रमानंतर डोकेदुखी चालू होणे, यात वेदना मानेच्‍या खालच्‍या भागामध्‍ये चालू होऊन त्‍या उजव्‍या डोळ्‍यामध्‍ये स्‍थिर होणे, ‘मान गळून पडेल’, असे वाटणे

१६. कल्‍केरिया फॉस्‍फोरिकम् (Calcarea Phosphoricum)

डॉ. अजित भरमगुडे

१६ अ. शाळकरी मुलींना जुलाबासह होणारी डोकेदुखी

१६ आ. हवामानातील पालटांमुळे होणारी डोकेदुखी

१६ इ. डोकेदुखी असतांना तंबाखूच्‍या धुराचा वास घेण्‍याची तीव्र इच्‍छा होणे, वास घेतल्‍यावर डोकेदुखी न्‍यून होणे

१६ ई. डोके दुखत असतांना चेहरा आणि डोके गरम होणे, सुस्‍ती येणे, मन अप्रसन्‍न असणे

१७. चायना ऑफिसिनॅलिस (China Officinalis)

१७ अ. डोक्‍यामध्‍ये धडकल्‍यासारख्‍या, फाडल्‍यासारख्‍या वेदना (jerking, tearing pains) होणे

१७ आ. मेंदू लाटांमध्‍ये कवटीवर धडकत असल्‍यासारखे जाणवणे

१७ इ. डोके केवळ एकाच बाजूला दुखणे

१७ ई. कानामध्‍ये आवाज येणे

१७ उ. डोकेदुखीमुळे झोप न लागणे

१७ ऊ. रात्री जागरण करणे आणि चालणे यांमुळे डोकेदुखी वाढणे

१७ ए. शांतपणे पडून राहिले असता डोकेदुखी न्‍यून होणे

१८. अँटिमोनियम क्रूडम् (Antimonium Crudum)

लोणचे, आम्‍लयुक्‍त पदार्थ खाणे, नदीमध्‍ये स्नान करणे यांमुळेे होणारी डोकेदुखी

१९. सेपिया ऑफिसिनॅलिस (Sepia Officinalis)

डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे

१९ अ. प्रतिदिन सकाळी होणार्‍या डोकेदुखीमुळे डोळे उघडणे कठीण होणे

१९ आ. डोकेदुखी असतांना संभोगाची तीव्र इच्‍छा होणे

१९ इ. डोकेदुखीचे तीव्र झटके येणे

२०. कॅनॅबिस इंडिका (Cannabis Indica)

२० अ. डोकेदुखी असतांना ‘जणू डोक्‍याची टाळू (डोक्‍याच्‍या वरचा मधला भाग) उघडत आहे आणि बंद होत आहे’, असे वाटणे

२० आ. डोकेदुखी असतांना जणू कवटी (डोक्‍याच्‍या वरचा मधला हाडाचा भाग) वर खेचली जात आहे, असे वाटणे

२० इ. डोकेदुखीसह पोटात वायू जमा होणे

२० ई. डोक्‍याची आपोआप हालचाल होणे

२० उ. मूत्रपिंडाच्‍या आजारामुळे डोकेदुखी होणे

२० ऊ. असामान्‍य खळबळ (excitement) आणि बडबड यांसह अर्धशिशी होणे

२१. कॅक्‍टस ग्रँडिफ्‍लोरस् (Cactus Grandiflorus)

२१ अ. डोक्‍याची वरची बाजू जणू आवळल्‍याप्रमाणेे, सर्व बाजूंनी पट्ट्याने आवळल्‍याप्रमाणे किंवा डोक्‍यावर मोठे ओझे ठेवल्‍याप्रमाणे दुखणे, असे दुखणे विशेषतः मासिक पाळीच्‍या तक्रारींसह किंवा रजोनिवृत्तीच्‍या (menopause च्‍या) वेळी दुखणे

२१ आ. डोके सकाळी ११ ते रात्री ११ या कालावधीत दुखणे

२२. आर्सेनिकम् आल्‍बम् (Arsenicum Album)

२२ अ. डोळ्‍यांच्‍या वरील भागात डोके दुखणे आणि टाळूवर आग होणे

२२ आ. ठराविक कालावधीनंतर डोकेदुखी उद़्‍भवणे आणि त्‍यासह अशक्‍तपणा जाणवणे किंवा अशक्‍तपणामुळे डोकेदुखी उद़्‍भवणे

२२ इ. ऊबेच्‍या संपर्कात येणे, डोके उंच करून झोपणे यांनंतर बरे वाटणे

२२ ई. प्रत्‍येक वेळी थोडे-थोडे; परंतु वारंवार पाणी पिणे

२३. लायकोपोडियम क्‍लॅव्‍हॅटम् (Lycopodium Clavatum)

२३ अ. डोकेदुखी असतांना टाळूवर, कानशिलावर (temple) (बहुतेक वेळा उजव्‍या), डोळ्‍यांच्‍या वर, नाकाच्‍या मुळाशी वेदना होणे

२३ आ. सायंकाळी ४ ते ८ या वेळेत डोकेदुखी सर्वाधिक असणे

२४. फॉस्‍फोरम् अ‍ॅसिडम् (Phosphorum Acidum) 

संभोग, तसेच डोळ्‍यांचा अतीवापर यांमुळे डोके दुखणे

२५. कॅलियम बायक्रोमिकम् (Kalium Bichromicum)

२५ अ. औषध घेऊन सर्दी तात्‍पुरती दाबल्‍यामुळे छोट्या छोट्या भागांमध्‍ये डोके दुखणे

२५ आ. एका डोळ्‍याच्‍या वर, विशेषतः उजव्‍या  डोळ्‍याच्‍या वर डोके दुखणे

२५ इ. डोकेदुखी चालू होण्‍यापूर्वी दृष्‍टी अस्‍पष्‍ट (blurred) होणे आणि वेदना चालू झाल्‍यानंतर दृष्‍टी सुधारणे

२६. कॅप्‍सिकम् (Capsicum)

२६ अ. खोकतांना डोकेदुखी चालू होऊन ‘कवटी फुटेल की काय ?’, असे वाटणे

२६ आ. संपूर्ण डोके दुखणे

२७. इपिकॅकुआन्‍हा (Ipecacuanha) : डोकेदुखी बरोबर मळमळ असणे

२८. सेड्रॉन (Cedron) : प्रतिदिन एकाच वेळी डोके दुखणे

२९. सेलेनियम मेटॅलिकम् (Selenium Metalicum) : चहा सेवन केल्‍यामुळे होणारी डोकेदुखी

३०. अँब्रा ग्रिसीया (Ambra Grisea) : वृद्धापकाळात होणारी डोकेदुखी आणि त्‍यासह उदासीन वाटणे

३१. बरायटा म्‍युरियाटिकम् (Baryta Muriaticum) : उच्‍च रक्‍तदाबामुळे होणारी डोकेदुखी

३२. अ‍ॅगारिकस मस्‍केरियस (Agaricus Muscarius) : डोकेदुखी आणि त्‍यासह नाकातून रक्‍तस्राव होणे.   (लेखमाला समाप्‍त)

‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्‍येक शुक्रवारी लेखाच्‍या रूपात प्रसिद्ध करण्‍यात येत आहे. तरी स्‍वउपचार करण्‍याच्‍या दृष्‍टीने साधक, वाचक, राष्‍ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्‍काळाच्‍या दृष्‍टीने संग्रही ठेवावेत. आपत्‍काळात डॉक्‍टर, वैद्य कुणीही उपलब्‍ध नसतील, त्‍या वेळी ही लेखमाला वाचून स्‍वतःच स्‍वतःवर उपचार करता येतील.