‘पेटा’सारख्या संस्थांवर भारत सरकारने नियमित पाळत ठेवायला हवी ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

‘पेटा’ने तमिळनाडू येथे हत्तींचे संचलन (परेड) थांबवून त्यांचा धार्मिक कार्यात वापर करणे थांबवले. नागपंचमीला नागांच्या पूजेला विरोध केला. जन्माष्टमीला गायीच्या दुधाचा वापर करण्यास विरोध केला….

हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

संसदेतील कायद्याप्रमाणे नाही, तर मंदिरामध्ये स्थानापन्न असलेल्या देवतेच्या नियमाप्रमाणे, तसेच हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिर चालले पाहिजे.

मंदिरांतील धन लुटणे आणि हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र ! – गंगाधर कुलकर्णी, कार्याध्यक्ष, श्रीराम सेना

मंदिरांतील धन लुटणे आणि हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र आहे. या मागे एस्.डी.पी.आय. आणि पी.एफ्.आय. या संघटना आहेत. याविषयी समाजात जागृती करणे आवश्यक आहे.  

आतापर्यंत ९ काश्मिरी हिंदूंना त्यांची काश्मीरमधील मालमत्ता परत मिळाली ! – केंद्रशासन

याचा अर्थ काश्मीरमध्ये अजूनही हिंदूंना सुरक्षित वातावरण निर्माण झालेले नाही. तेथील धर्मांध आणि जिहादी आतंकवादी यांचा निःपात केला, तरच तेथे हिंदूंना सुरक्षित वाटेल !

दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलीचे धर्मांधासमवेत पलायन झाल्याची शक्यता !

लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांधांकडून हिंदु कुटुंबांना उद्ध्वस्त केले जात आहे. सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने आतापर्यंत लक्षावधी हिंदु मुलींचे धर्मांतर होऊन त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.

या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! 

बांगलादेशातील शियाली गावात शेकडो धर्मांधांनी  ७ ऑगस्टच्या दुपारी हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण करत तेथे नासधूस केली. यामध्ये ४ मोठ्या आणि ६ छोट्या मंदिरांचा समावेश आहे.

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात शेकडो धर्मांधांकडून हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

इस्लामी देशांत अल्पसंख्य हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांच्यावर सातत्याने होणारी आक्रमणे हे भारतातील हिंदू आणि सर्वपक्षीय शासनकर्ते यांना लज्जास्पद !

तमिळनाडूतील मंदिरांना वाली कोण ?

आज मात्र तमिळनाडू राज्याचे चित्र वेगळे आहे. तेथील आधुनिक ‘गझनी’रूपी राजकारण्यांच्या हिंदुविरोधी भूमिकेमुळे तमिळनाडूतील मंदिरे आणि संस्कृती यांचा र्‍हास होत चालला आहे……

धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार संघटित होऊन नोंदवावी ! – अधिवक्ता युधवीरसिंह चौहान, देहली उच्च न्यायालय

फेसबूककडून हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांचे ‘हेट स्पीच’च्या (द्वेषी भाषणाच्या) नावाखाली पान बंद केले जाते. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यास कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही……

ब्रिटनमध्ये आता हिंदु आणि शीख यांना करता येणार अस्थी विसर्जन !

ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्याची अनुमती हिंदु आणि शीख समाजाला नव्हती.