फेसबूककडून हिंदु धर्माविषयी बोलणार्यांचे ‘हेट स्पीच’च्या (द्वेषी भाषणाच्या) नावाखाली पान बंद केले जाते. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यास कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही. याउलट इतर धर्मांतील लोक त्यांच्या धर्माविषयी कुठे उलट-सुलट बोलले जात नाही ना ? यावर लक्ष ठेवून असतात. आपल्याकडे मात्र ‘मला काय त्याचे ? बोलले तर राहू दे, मला फरक पडत नाही’, अशा विचारसरणीचे लोक असल्याने फेसबूकसारख्या हिंदुद्वेष्ट्या आस्थापनांचे फावते. हे रोखण्यासाठी धार्मिक भावना दुखावल्या गेल्यास आपण जागरूक राहून संघटित व्हायला हवे, तसेच याविषयी तक्रार नोंदवली पाहिजे.