(म्हणे) ‘बिकिनी, घुंघट, जीन्स किंवा हिजाब आदी घालण्याचा महिलांना अधिकार !’ – प्रियांका वाड्रा

शाळेतील हिजाबवर बंदी घालणे अयोग्य असल्याची भाषा करणार्‍या प्रियांका वाड्रा कॉन्वेंट शाळांमध्ये हिंदु मुलींनी हातांवरील मेंदी, कानातले घालणे आदींवर असलेल्या बंदीवर कधीच का बोलत नाहीत ?

हिजाबच्या मागे सीएफ्आय आणि एसडीपीआय यांचा राजकीय स्वार्थ ! – भाजपचे आमदार रघुपती भट यांचा आरोप

‘या संघटनांनी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची दिशाभूल केली आहे’, असा आरोपही त्यांनी केला. या दोन्ही संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या शाखा आहेत.

हिजाबला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सह्यांची मोहीम !

धर्मासाठी लगेच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणार्‍या धर्मांध महिला कुठे आणि हिंदु धर्मरक्षणार्थ काहीच कृती न करणार्‍या हिंदु महिला कुठे ?

हिजाबचे प्रकरण आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपिठाकडे !

मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास अनुमती देण्याची मागणी करणार्‍या ४ याचिकांवर सुनावणी करतांना कर्नाटक उच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे.

जगातील फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आदी देशांमध्ये आहे शाळेत हिजाब घालण्यावर बंदी !

एरव्ही स्त्रीमुक्त आंदोलन करणार्‍या महिला संघटना हिजाबच्या विरोधात का बोलत नाहीत कि त्यांचे धर्मांधांविषयी बोलण्याचे धाडस होत नाही ?

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना ‘अल्ला हू अकबर’ म्हणत विरोध करणार्‍या मुसलमान विद्यार्थिनीला ५ लाख रुपयांचे पारितोषिक

जर या ठिकाणी हिंदु विद्यार्थिनी असती आणि धर्मांध विद्यार्थी असते, तर त्यांनी या हिंदु मुलीची काय अवस्था केली असती, हे वेगळे सांगायला नको !

‘महाविद्यालय अभ्यास आणि हिजाब यांपैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे !’ – नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफजई

जर कर्नाटकातील मुसलमान विद्यार्थिनींना नियम मोडून महाविद्यालयांमध्ये हिजाब घालायचा असेल, तर त्यांनी तालिबानी अफगाणिस्तानमध्येच चालते व्हावे, असे कुणी राष्ट्रप्रेमी आणि नियमांचे पालन करणार्‍या भारतियाने म्हटल्यास चुकीचे कसे ठरेल ?

पुदुच्चेरीमध्येही मुसलमान विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्याची अनुमती नाही !

पुद्दुचेरी राज्यातील अरियांकुप्पम् सरकारी शाळेमध्ये एका मुसलमान विद्यार्थिनीने तिला वर्गात हिजाब घालण्याची अनुमती नाकारल्यामुळे ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ या मुसलमान संघटनेने सरकारी शाळेबाहेर आंदोलन केले.

मध्यप्रदेशामध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव नाही ! – गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मध्यप्रदेशामध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही. हिजाबवर बंदी घालण्याविषयीचा वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, असे राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे.

(म्हणे) ‘हिजाब बंदी म्हणजे भारतात मुसलमानांचे दमन करण्यातील कटाचा एक भाग !’

भारतात केवळ महाविद्यालयांमध्ये नियमानुसार हिजाब बंदी केल्यावर थयथयाट करणार्‍या पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकमध्ये हिंदूंना किती धार्मिक अधिकार देण्यात आले आहेत, हेही सांगितले पाहिजे !