(म्हणे) ‘हिजाब बंदी म्हणजे भारतात मुसलमानांचे दमन करण्यातील कटाचा एक भाग !’

पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांची गरळओक !

  • भारतात केवळ महाविद्यालयांमध्ये नियमानुसार हिजाब बंदी केल्यावर थयथयाट करणार्‍या पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकमध्ये हिंदूंना किती धार्मिक अधिकार देण्यात आले आहेत, हेही सांगितले पाहिजे ! – संपादक
  • एकीकडे पाकमधील अल्पसंख्यांकावर अत्याचार करायचा, त्यांचा वंशसंहार करायचा आणि दुसरीकडे धर्मनिरपेक्ष भारतावर खोटे आरोप करायचे, हा पाकचा कांगावाच होय ! – संपादक
डावीकडे पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतामध्ये मुसलमान मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. कुणालाही अशा प्रकारचे मूलभूत अधिकारापासून विन्मुख करणे आणि हिजाबवरून त्यांना सातवणे, हे त्यांचे दमनच आहे. जगाला हे लक्षात घ्यायला हवे की, हा भारत सरकारच्या मुसलमानांचे दमन करण्याच्या कटातील एक भाग आहे, अशी गरळओक पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर ट्वीट करून केली आहे.

(म्हणे) ‘नागरिकांना मोकळेपणाने याचा निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे !’- पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी

पाकमध्ये असा मोकळेपणाचा अधिकार आहे का ? अनेक मुसलमान मुली आणि तरुणी यांना बुरखा अन् हिजाब नको आहे, तरी त्यांच्यावर बळजोरी केली जाते, याविषयी फवाद चौधरी तोंड का उघडत नाहीत ?

याविषयी पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनीही ट्वीट करतांना म्हटले की, मोदी यांच्या भारतात जे काही चालू आहे, ते भीतीदायक आहे. भारतीय समाज अस्थिर नेतृत्वाखाली प्रचंड गतीने पतनाकडे जात आहे. हिजाब घालणे किंवा अन्य वेशभूषा परिधान करणे, ही व्यक्तीगत आवड आहे. नागरिकांना मोकळेपणाने याचा निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे.