जगातील फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आदी देशांमध्ये आहे शाळेत हिजाब घालण्यावर बंदी !

  • जर जगातील शक्तीशाली आणि पुरोगामी देश हिजाबवर बंदी घालत असतील, तर ‘पुरोगामी’ म्हणून ओळख सांगणार्‍या भारतामध्ये शाळा, महाविद्यालये यांठिकाणी हिजाबवर बंदी घालण्यास पुरो(अधो)गाम्यांचा विरोध कशाला ? – संपादक
  • एरव्ही स्त्रीमुक्त आंदोलन करणार्‍या महिला संघटना हिजाबच्या विरोधात का बोलत नाहीत कि त्यांचे धर्मांधांविषयी बोलण्याचे धाडस होत नाही ? – संपादक

नवी देहली – कर्नाटकमधील महाविद्यालयांमध्ये हिजाब घालून जाण्यास अनुमती देण्यासाठी मुसलमान विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या मागणीसाठी आंदोलनही चालू आहे. याला हिंदु विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. असे असले, तरी जगभरातील अनेक देशांमध्ये मात्र हिजाबवर बंदी आहे.

यात फ्रान्स, अमेरिका आदी देशांचाही समावेश आहे. या देशांमध्ये कोणत्याही धर्माची वेशभूषा करून शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती नाही.