पुदुच्चेरीमध्येही मुसलमान विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्याची अनुमती नाही !

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFAI) चे प्रतिनिधी, थंथाई पेरियार द्रविड कळघम, DMK पदाधिकारी विद्यार्थिनीला वर्गात हिजाब घालू न दिल्याच्या निषेधार्थ शाळेत पोहोचले

पुदुच्चेरी – पुदुच्चेरी राज्यातील अरियांकुप्पम् सरकारी शाळेमध्ये एका मुसलमान विद्यार्थिनीने तिला वर्गात हिजाब घालण्याची अनुमती नाकारल्यामुळे ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ या मुसलमान संघटनेने सरकारी शाळेबाहेर आंदोलन केले. यानंतर पोलीस येथे पोचले. पुदुच्चेरी सरकारच्या शालेय शिक्षण संचालनालयाने अरियांकुप्पम् सरकारी शाळेच्या प्रमुखाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. मुसलमान विद्यार्थिनींचे म्हणणे आहे, ‘आम्हाला पूर्वी हिजाबची अनुमती होती; मात्र आता विरोध केला जात आहे.’ यावर शाळेकडून सांगण्यात आले की, महाविद्यालयाच्या आवारात ‘स्कार्फ’ला अनुमती आहे; मात्र आता त्यांच्याकडून वर्गातही तो घालण्यात आल्याने त्याला अनुमती नाकारण्यात आली आहे.

काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदु मुलींनाही हिजाब घालण्याचा कायदा होईल !’ – कर्नाटकचे ऊर्जामंत्री सुनील कुमार यांची टीका

भाजपचे नेते आणि कर्नाटक सरकारमधील ऊर्जा मंत्री सुनील कुमार यांनी काँग्रेसवर टीका करतांना म्हटले की,

राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदूंना हिजाब घालण्यास सांगणारा कायदा आणण्याची शक्यता आहे.