बांगलादेशातील वैद्यकीय महाविद्यालयात सर्व धर्माच्या विद्यार्थिनींसाठी हिजाब अनिवार्य !

कर्नाटकमधील हिजाबविरोधी आंदोलनांवरून भारतात अल्पसंख्यांचे धार्मिक अधिकार चिरडले जात असल्याची ओरड करणारे इस्लामी देश बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या चिरडल्या जाणार्‍या धार्मिक अधिकारांविषयी चकार शब्दही काढत नाहीत !

इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक

हिजाबच्या वादावरून हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इस्लाममधील बुरखा

बुरख्याची चाल ही एक अत्यंत अडाणी, अडगळीची विद्रूप रूढी आहे. ती मागच्या छप्पन्न पोथ्यांतून आली असली, तरी ती आज टाकली पाहिजे, हे हिंदी मुसलमानांच्या ध्यानात आले नसले, तरी जगातील प्रगत मुसलमानांच्या ध्यानात आलेले आहे.

कर्नाटकातील हिजाब वादाच्या प्रकरणी ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’विरुद्ध गुन्हा नोंद

हिजाब घालून वर्गात बसण्यास अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ एका महाविद्यालयातील ६ विद्यार्थिनींनी १ जानेवारीला सी.एफ्.आय. या संघटनेच्या पत्रकार परिषदेत स्वतःची बाजू मांडली होती.

एकमेकांविषयी द्वेषभावना उत्पन्न करणारे विष मुलांच्या मनात कालवणे अयोग्य ! – सद्गुरु जग्गी वासुदेव

मातीमध्ये सर्वांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य आहे. लहान वयात मुक्तपणे वाढण्याचे वातावरण निर्माण व्हायला हवे. प्रत्येक नव्या पिढीवर आधीच्या पिढ्यांचे विचार आणि पूर्वग्रह थोपवले जाऊ नये. – ‘हिजाब’ वादावर सद्गुरु जग्गी वासुदेव

(म्हणे) ‘पाकमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ हा ‘हिजाब दिवस’ म्हणून साजरा करावा !’  

पाकच्या मंत्र्याची पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मागणी
भारतातील हिजाब बंदीकडे जगाने लक्ष देण्यासाठी केली मागणी !

हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणी काशिफ आणि नदीम यांना अटक

याचा अर्थ ही हत्या धर्मांधांनीच केली, हे स्पष्ट झाले आहे. आता याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?

शाळेचे नियम पटत नसतील, तर मदरशांत प्रवेश घ्यावा ! – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विहिंप

परांडे पुढे म्हणाले की, हिजाब धर्माला आवश्यकच आहे, तर आतापर्यंत मुसलमान महिला हिजाब घालत नव्हत्या. त्या काय धर्मविरोधी आचरण करत होत्या का ?

हिजाब प्रकरणावर चर्चा करणारे संघ स्वयंसेवक आणि प्रचारक यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण !

हिंदुत्वनिष्ठ योगी सरकार असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये धर्मांध हे हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण करण्यास धजावतात, याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येते.

बुरखा महिलांच्या अपमानाचे प्रतीक ! – तस्लिमा नसरीन

बुरखा हे महिलांच्या अपमानाचे प्रतीक आहे. खरे सांगायचे, तर महिलांसाठी हे जितके अपमानास्पद आहे, त्याहूनही अधिक ते पुरुषांसाठी आहे.