कर्नाटकातील हिजाब वादाच्या प्रकरणी ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’विरुद्ध गुन्हा नोंद

प्रातिनिधिक छायाचित्र

उडुपी (कर्नाटक) – उडुपी जिल्ह्यातील शासकीय कनिष्ठ महिला महाविद्यालयातील काही शिक्षकांना धमकावल्याच्या प्रकरणी ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ (सी.एफ्.आय.) या संघटनेच्या सदस्यांविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती कर्नाटक सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयाला दिली. ‘राज्यातील हिजाब वादाच्या संबंधात सी.एफ्.आय. या संघटनेची भूमिका काय ?’ याची माहिती देण्यास न्यायालयाने सरकारला सांगितले होते. हिजाब घालून वर्गात बसण्यास अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ एका महाविद्यालयातील ६ विद्यार्थिनींनी १ जानेवारीला सी.एफ्.आय. या संघटनेच्या पत्रकार परिषदेत स्वतःची बाजू मांडली होती.