सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांच्‍या घरी गौरींचे दर्शन घेतांना साधिकेला आलेल्‍या अनुभूती

पू. वामन यांच्‍या घरी गौरींचे दर्शन घेतांना गौरींची हालचाल होत असून त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून पाणी येत असल्‍याचे जाणवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवापूर्वी खेळण्यांच्या माध्यमातून आणि निसर्गाशी सूक्ष्मातून संवाद साधून ब्रह्मोत्सव भावपूर्ण साजरा करणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) !

पू. वामन यांनी खेळण्यांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा रथोत्सव सोहळा साजरा करणे

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी दिलेला संदेश !

‘सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण सर्वांनी कसे प्रयत्न करायचे ? परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी श्रद्धा आणि भाव कसा ठेवायचा ?’, या संदर्भात हिंदी भाषेत ध्वनीमुद्रण (ऑडिओ रेकॉर्डिंग) केले आहे.

प्रेमळ, आनंदी, प्रगल्भ आणि संत ज्ञानेश्वर-मुक्ताई यांच्याप्रमाणे सुंदर आध्यात्मिक नाते असलेली सनातन संस्थेतील बहीण-भावाची दैवी जोडी पू. वामन अन् कु. श्रिया राजंदेकर ! ! 

प्रगल्भ, आनंदी आणि लोभस बहीणभावाची जोडी म्हणजे जन्मतः ७१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) आणि ६६ टक्के पातळी असलेली त्यांची बहीण कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे) !

प्रेमळ, प्रगल्भ आणि देवाच्या अनुसंधानात असणारी फोंडा (गोवा) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १२ वर्षे) !

चैत्र कृष्ण एकादशी (१६.४.२०२३) या दिवशी फोंडा, गोवा येथील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिचा १२ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

(कै.) पू. पद्माकर होनप यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दिव्य रथोत्सव सोहळा पहाण्यासाठी मी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांना घेऊन आश्रमाच्या पुढच्या बाजूला आसंदीवर बसले होते. त्या वेळी तिथे पू. होनपकाका आणि अन्य संतही उपस्थित होते.

घराच्‍या परिसरात असलेली झाडे, पक्षी अन् प्राणी यांच्‍याशी प्रेमाने संवाद साधून त्‍यांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर !

आमच्‍या घराच्‍या सभोवताली पुष्‍कळ मोठी (आंबा, फणस, काजू, सागवान यांची) झाडे आहेत. त्‍या झाडांवर अनेक पक्षी येऊन बसतात. ३०.१२.२०२२ या दिवशी घराच्‍या बाजूला असलेल्‍या आंब्‍याच्‍या झाडावर एक पक्षी बसला होता.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये आलेले छायाचित्र पहातांना आलेल्‍या अनुभूती !

‘माझ्‍यावर आवरण आल्‍यामुळे सेवेला जाऊ नये’, असे मला वाटत होते; पण पू. वामन यांचे छायाचित्र पहाताच ‘मला चैतन्‍य मिळत आहे’, असे तीव्रतेने जाणवले.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांना पाहिल्यावर आलेल्या अनुभूती

पू. वामन राजंदेकर त्यांच्या आईंच्या (सौ. मानसी राजंदेकर यांच्या समवेत) येत होते. मी पू.वामन यांच्याविषयीचा ग्रंथ वाचला होता; पण प्रत्यक्ष त्यांना प्रथमच पहात होते. त्या वेळी ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता आणि सनातन संस्थेचे प्रत्येक संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अंतरंगी जोडलेले असल्याचे अनुभवणे

परात्पर गुरुदेवांच्या एका वाक्याने प्रत्यक्ष भगवंताने प्रचीती दिली की, ‘ते प्रत्येक क्षणी आमच्या समवेत आहेत. आमचा प्रत्येक शब्द ते ऐकत आहेत. त्यांना सर्व ठाऊक असते.’