आले पू. वामन उद्धरण्या अनेक साधक-जिवांसी ।

पू. वामन यांच्या वाढदिवसानिमित्त स्फुरलेली कविता !

पू. वामन राजंदेकर
कु. श्रिया राजंदेकर

नारायण वसे ज्यांच्या ।
ध्यानी, मनी, स्वप्नी ।। १ ।।

नारायणाच्या कार्यास्तव आले पृथ्वीवर जन्मासी ।
उद्धरण्या अनेक साधक-जिवांसी ।। २ ।।

ज्ञानयोगे देती ज्ञानाची पुंजी ।
उडवितात अंतर्मनातील आनंदाची कारंजी ।। ३ ।।

जणू ज्ञानराय (टीप १) आले फिरूनी जन्मासी ।
पुनश्च भावभक्तीचा झेंडा उंचावण्यासी ।। ४ ।।

सौ. अंजली जोशी

वाटते पूर्वजन्मी होते ते मुक्ताईचे (टीप २) मोठे बंधू (टीप १)।
आता मुक्ताईसी मोठेपण देऊनी झाले गुरुबंधू (टीप ३) ।। ५ ।।

अशा पूजनीय वामन यांच्या जन्मदिनी ।
शरणागतभावे शत शत वंदन त्यांच्या चरणी ।। ६ ।।

टीप १ – संत ज्ञानेश्वर

टीप २ – संत मुक्ताबाई

टीप ३ – कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १२ वर्षे) ही पू. वामन यांची मोठी बहीण आहे. तिचा पू. वामन यांच्याप्रती भाव आहे.’

– सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज. (२६.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक