१. पू. वामन यांच्या घरी गौरींचे दर्शन घेतांना गौरींची हालचाल होत असून त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत असल्याचे जाणवणे
‘४.९.२०२२ या दिवशी मी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांच्या फोंडा (गोवा) येथील घरी गौरींचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी ‘गौरींची हालचाल होत असून त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत आहे’, असे मला जाणवले.
२. पू. वामन यांच्या घरच्या गौरींचे मुखवटे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रमाणे दिसणे
एका गौरीच्या मुखवट्यामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि दुसर्या गौरीच्या मुखवट्यामध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे रूप मला दिसले. सर्व जण गौरींचे मुखवटे घेतांना साधारण सारखेच घेतात; परंतु पू. वामन यांच्या घरच्या गौरींचे मुखवटे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रमाणे दिसत होते. मी अशा चैतन्यमय गौरी कधीच पाहिल्या नव्हत्या.
३. पू. वामन यांच्या घरी गेल्यावर माझे मन निर्विचार झाले. त्या वेळी ‘त्यांचे घर मंदिर आहे’, असे मला वाटले.
‘पू. वामन यांच्या घरी गौरींचे दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि सर्व अनुभवता आले’, याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. वामन यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. मनीषा पिंपळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |