पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये !

‘सनातन संस्‍थेचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांचा वाढदिवस २६ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी झाला. पू. वामन यांचे एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे त्‍यांचे रूप अत्‍यंत मनमोहक आहे. त्‍यांना पाहिल्‍यावर पहाणार्‍या व्‍यक्‍तीला आनंदाची अनुभूती येते आणि ‘त्‍यांना सतत पहातच रहावे’, असे वाटते. त्‍यांच्‍यामध्‍ये अनेक दैवी लक्षणे आहेत. या लेखातून आपण त्‍यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये जाणून घेऊया.

पू. वामन राजंदेकर

१. मातेच्‍या गर्भात असतांना ‘गँ’ या बीजमंत्राचा जप करणे

जेव्‍हा सौ. मानसी राजंदेकर गरोदर होत्‍या, तेव्‍हा पू. वामन त्‍यांच्‍या गर्भात असतांना श्री गणेशाचा ‘गँ’ या बीजमंत्राचा जप अखंड करत होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडे श्री गणेशाची शक्‍ती आकृष्‍ट होऊन त्‍यांच्‍याभोवती दैवी शक्‍तीचे संरक्षककवच निर्माण झाले होते.

२. पू. वामन यांनी जन्‍माच्‍या पहिल्‍या दिवसापासून आतापर्यंत ‘ॐ नमो नारायणाय ।’ हा नामजप करणे

कु. मधुरा भिकाजी भोसले

जेव्‍हा पू. वामन यांचा जन्‍म झाला, तेव्‍हा श्री गणेशाच्‍या कृपेने त्‍यांचे श्रीमन्‍नारायणांशी अनुसंधान चालू झाले. त्‍यामुळे त्‍यांचा जन्‍माच्‍या पहिल्‍या दिवसापासून आतापर्यंत ‘ॐ नमो नारायणाय ।’ हा नामजप चालू झाला. अशा प्रकारे ते श्रीमन्‍नारायणाचे परम भक्‍त असून ते श्रीमन्‍नारायणस्‍वरूप असणार्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अवतारी कार्यात सहभागी होणार आहेत.

३. पू. वामन हे गणेशभक्‍त ऋषि वामदेवांचे अवतार असणे

ऋषि वामदेव हे श्री गणेशाचे थोर भक्‍त होते. त्‍यांच्‍या कृपेमुळेच श्री गणेशाला ‘मूषक’, म्‍हणजे ‘उंदीर’ या वाहनाची प्राप्‍ती झाली होती. अशा थोर ऋषींचा अवतार असल्‍यामुळे पू. वामन यांच्‍यावर श्री गणेशाचा वरदहस्‍त आहे, तसेच त्‍यांची दैवी क्षमता पुष्‍कळ असून ते श्री गणेशाप्रमाणे विघ्‍नहर्ता आहेत. त्‍यांचे दर्शन घेतल्‍यावर अनेकांच्‍या साधनेतील विघ्‍ने दूर होतात.

४. पू. वामन यांच्‍यामध्‍ये श्री गणेशतत्त्व आणि विष्‍णुतत्त्व या दोन्‍ही तत्त्वांचा मिलाप झालेला असणे

पू. वामन हे गणेशलोकवासी ऋषि वामदेव यांचे अवतार असल्‍यामुळे त्‍यांचा जन्‍म गणेशोत्‍सवाच्‍या कालावधीत झाला. त्‍यांच्‍यामध्‍ये ३ टक्‍के गणेशतत्त्व आहे, तसेच त्‍यांच्‍यामध्‍ये विष्‍णुतत्त्व असल्‍यामुळे त्‍यांची जन्‍मतिथी ‘वामन जयंती’, म्‍हणजे भागवत एकादशी आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये श्रीविष्‍णूचे तत्त्व ५ टक्‍के आहे. अशा प्रकारे त्‍यांच्‍यातील विष्‍णुतत्त्वाचे प्रमाण अधिक असल्‍यामुळे त्‍यांना ‘वामन’ हे नाव प्राप्‍त झाले आहे. ते श्रीविष्‍णूच्‍या ‘वामन’ या ५ व्‍या क्रमांकाच्‍या अवताराप्रमाणे ते अष्‍टसिद्धींनी संपन्‍न असून त्‍यांच्‍यासारखे पराक्रमी होणार आहेत.

४ अ. श्री गणेशामुळे पू. वामन यांच्‍यामध्‍ये ज्ञानशक्‍ती आणि श्रीविष्‍णुमुळे क्रियाशक्‍ती कार्यरत असणे

श्री गणेशामुळे पू. वामन यांच्‍यामध्‍ये ज्ञानशक्‍ती आणि श्रीविष्‍णुमुळे क्रियाशक्‍ती या २ दैवी शक्‍ती कार्यरत झाल्‍या आहेत. त्‍यामुळे ते ज्ञानशक्‍तीच्‍या बळावर अन्‍य जिवांना धर्माचरण आणि साधना यांच्‍या संदर्भात स्‍थूल अन् सूक्ष्म अशा दोन्‍ही स्‍तरांवर अचूक मार्गदर्शन करतात. तसेच श्रीविष्‍णूच्‍या क्रियाशक्‍तीमुळे त्‍यांची पंचसूक्ष्म ज्ञानेंद्रिये आणि पंचसूक्ष्म कर्मेंद्रिये पुष्‍कळ प्रमाणात कार्यरत आहेत. त्‍यामुळे त्‍यांना पंचसूक्ष्म ज्ञानेंद्रियांमुळे सूक्ष्म जगताचे अवलोकन करता येते आणि पंचसूक्ष्म कर्मेंद्रियांमुळे अनिष्‍ट शक्‍तींशी युद्ध करता येते.

४ आ. विविध प्रकारचे तेज कार्यरत असणे

श्रीगणेशाच्‍या तत्त्वामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये ब्राह्मतेज आणि ज्ञानतेज कार्यरत झाले आहे, तसेच श्रीविष्‍णूच्‍या तत्त्वामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये क्षात्रतेज आणि धर्मतेज कार्यरत झाले आहे.

५. विविध घटक, त्‍यांचे प्रमाण आणि पू. वामन यांच्‍याभोवती निर्माण झालेल्‍या विविध उच्‍च लोकांच्‍या वायूमंडलाचे प्रमाण अन् होणारे लाभ !

६. पू. वामन यांनी विविध योगमार्गांनी केलेली साधना आणि त्‍यांना प्राप्‍त झालेले विविध प्रकारचे दैवीबळ !

७. तात्‍पर्य

अशा प्रकारे सर्वांचे मन मोहवून टाकणारे पू. वामन यांचे दर्शन, मार्गदर्शन आणि अस्‍तित्‍व अत्‍यंत शुभ अन् मंगलमय आहे. त्‍यामुळे हे लेखपुष्‍प त्‍यांच्‍या सुकोमल चरणी कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.

८. कृतज्ञता

‘श्री गुरूंच्‍या कृपेमुळेच ऋषितुल्‍य असणार्‍या पू. वामन राजंदेकर या बालसंतांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये लेखबद्ध करता आली’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

९. प्रार्थना

‘त्‍यांच्‍याप्रमाणे आम्‍हा साधकांमध्‍येही दैवी गुणांची वृद्धी होवो’, हीच ईश्‍वराच्‍या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.९.२०२३ सकाळी ११.१०)


पू. वामन राजंदेकर यांच्‍या चरणी अर्पियली भावसुमनांजली !

गोड तुमचे हास्‍य आणि मधुर तुमचे बोल ।
दिव्‍य तुमचे दर्शन आणि मार्गदर्शन अनमोल ॥ १ ॥

तुम्‍ही आहात विघ्‍नेश्‍वर श्रीगणेशाचे रूप ।
तुम्‍ही भासता जणू श्रीवामनावताराचेच स्‍वरूप ॥ २ ॥

तुमच्‍या दर्शनाने आमची संकटे होतात दूर ।
तुमच्‍या कृपेमुळे डोळ्‍यांत येतो भावाश्रूंचा पूर ॥ ३ ॥

तुमच्‍या दर्शनाने मन होते प्रसन्‍न ।
तुम्‍ही तर आहात सर्वगुणसंपन्‍न ॥ ४ ॥

श्री गुरुकृपेने सुचलेली ही काव्‍यपुष्‍पांजली ।
अर्पिते तुमच्‍या चरणी ही भावसुमनांजली ॥ ५ ॥

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.