राजापूर येथे ‘हलालमुक्त’ दिवाळीच्या खरेदीला प्रारंभ !

‘कारण नसतांना मुसलमानेतर ग्राहकांच्या माथी ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने मारली जात आहेत.’, या गोष्टींचा विरोध केल्यामुळे विवेक गुरव यांचे कौतुक करण्यात आले.

खोपोली येथे आयुर्वेदाद्वारे कर्करोगावरील उपचारासाठी रुग्णालय उभारणार !  

खोपोली येथे टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडून आयुर्वेदाद्वारे कर्करोगावरील उपचारासाठी संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. आयुर्वेदाच्या साहाय्याने कर्करोगावर उपचार करणारे हे देशातील पहिलेच रुग्णालय असेल. तेथे कर्करोगावरही संशोधन करण्यात येणार आहे.

दिवाळीत फटाके फोडणे टाळा आणि मास्क वापरा !  

राज्यात वायूप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आरोग्य विभागाकडून नियमावली घोषित करण्यात आली आहे. राज्यातील १७ मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने दक्षता घेण्याची सूचना केली आहे.

अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी कोणत्याही छापील वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करणे आरोग्याला धोकादायक !

आरोग्याला असलेला गंभीर धोका लक्षात घेऊन शिजवलेले किंवा तयार खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर कटाक्षाने टाळावा. त्याऐवजी कोरे कागद किंवा बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांचा वापर करावा.

पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ जणांना चावा !

संतप्त ग्रामस्थांनी कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार केले आहे. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यावर उपचारासाठी ‘अँटिरेबिज लस’ उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील रस्ते धुण्यास प्रारंभ !

मुंबई उच्च न्यायालयाने हवेच्या प्रदूषणावरून फटकारले या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगरात ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करण्यात येतील हा निर्णय घेण्यात आला.

मला औषधे कधी थांबवता येतील ?

आजाराचे बीज समूळ नष्ट करणे आणि त्या आजाराने शरिराची केलेली हानी भरून काढणे, याचे महत्त्व आपल्या लक्षात आले असेल, तर आयुर्वेदोक्त ‘अपुनर्भव’ आणि ‘रसायन’ चिकित्सेला पर्याय नाही. ‘औषधे कधी थांबवता येतील ?’, या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल, अशी अपेक्षा !’

ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया चालू असतांना रुग्ण पियानो वाजवत हनुमान चालिसा म्हणत होता !

सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित !

उलटी (Vomiting) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्‍यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

आशा स्वयंसेविकांना २ सहस्र रुपये दिवाळी बोनस !

सद्य:स्थितीत राज्यात ८० सहस्रांहून अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना ५ सहस्र रुपये मानधन देण्यात येत होते. आता आरोग्यमंत्र्यांच्या वरील घोषणेनंतर आशासेविकांना १५ सहस्र रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.