सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित !
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे एका तरुणाच्या ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया चालू असतांना हा तो पियानो वाजवत हनमान चालिसाचे पठण करत होता.
शस्त्रक्रिया करतांना ज्या ठिकाणी ती करायची असते, तेथे भूल दिली जाते. त्यानुसार या तरुणाला भूल देण्यात आली होती. शस्त्रक्रियेच्या कालावधीत त्याने शांतपणे पियानो वाजवला, वर्तमानपत्र वाचले, तसेच हनुमान चालिसाचे पठणही केले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
सौजन्य: TV9 Madhya Pradesh Chhattisgarh
शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरांपैकी डॉ. सुमित राज यांनी सांगितले की, या तरुणाचे ट्युमर यशस्वीरित्या काढून टाकण्यात आले आहे. शस्त्रक्रियेच्या वेळी त्याच्यावर कुठलाही वाईट परिणाम झाला नाही.