मुंबई – राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत असलेल्या आशा स्वयंसेविकांना ७ सहस्र रुपये मानधनवाढ आणि गटप्रवर्तकांना प्रत्येकी ६ सहस्र २०० रुपये मानधनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना २ सहस्र रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका आणि संघटना यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगितले.
सद्य:स्थितीत राज्यात ८० सहस्रांहून अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना ५ सहस्र रुपये मानधन देण्यात येत होते. आता आरोग्यमंत्र्यांच्या वरील घोषणेनंतर आशासेविकांना १५ सहस्र रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.