टाटा इन्स्टिट्यूटचा स्तुत्य निर्णय !
मुंबई – खोपोली येथे टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडून आयुर्वेदाद्वारे कर्करोगावरील उपचारासाठी संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. आयुर्वेदाच्या साहाय्याने कर्करोगावर उपचार करणारे हे देशातील पहिलेच रुग्णालय असेल. तेथे कर्करोगावरही संशोधन करण्यात येणार आहे. अंदाजे २१ एकर जागेवर १०० खाटांची क्षमता असलेले रुग्णालय वर्ष २०२६ पर्यंत उभारण्यात येईल. कर्करोगावर प्रभावीपणे उपचार करणारी आयुर्वेद औषधे संशोधन केंद्रात शोधली जातील. आयुर्वेदाच्या साहाय्याने संशोधन आणि उपचार यांंवर भर दिला जाईल, अशी माहिती टाटा हॉस्पिटलमधील कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी दिली.