पोलीस दल कि वासनांधांचा अड्डा ?

पोलीस ज्‍या गुन्‍ह्यांसाठी गुन्‍हेगारांना पकडतात, तेच गुन्‍हे जर खाकी वेशातील पोलिसांची टोळी करू लागली, तर अराजकतेखेरीज दुसरे काय निर्माण होणार ? महिलांना पोलीस दलातील वासनांधांकडून धोका असणे, हे महाराष्‍ट्राला अत्‍यंत लज्‍जास्‍पद !

Goa Late Night Music Parties :मोरजी आणि मांद्रे या संवेदनशील समुद्रकिनार्‍यांवर रात्रीच्या वेळी कर्णकर्कश संगीत पार्ट्या नित्याच्याच !

पर्यावरणप्रेमी याविषयी आवाज का उठवत नाहीत ? त्यांचे पर्यावरणप्रेम केवळ विकास प्रकल्पांना विरोध करण्यापुरतेच आहे का ?

निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याकडून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आक्षेपार्ह वर्तनाविषयीची माहिती उघड !

सरकारने यातील दोषी पोलीस अधिकार्‍यांची नावे उघड करून, तसेच त्यांची पोलीस दलातून तात्काळ हकालपट्टी करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, असेच जनतेला वाटते !

नीरा (जिल्‍हा पुणे) येथे पोलीसच निघाला अट्टल दुचाकीचोर !

पोलीस खात्‍यात अशा पोलिसांचा भरणा असल्‍यास गुन्‍हेगारी वाढली नाही तरच नवल ! यातून नोकरी देतांना शिक्षणासह व्‍यक्‍तीचे गुणही का पाहिले पाहिजेत, ते लक्षात येते.

पुणे येथील ललित पाटील पलायन प्रकरणी २ पोलिसांना अटक !

अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील ‘ससून’मधून पळून गेला होता. त्‍या वेळी ‘ससून रुग्‍णालया’तील बंदीवानांच्‍या उपचार कक्षात नियुक्‍तीस असलेल्‍या २ पोलिसांनी कर्तव्‍यामध्‍ये कसूर करून पाटील याला पळून जाण्‍यास साहाय्‍य केल्‍याप्रकरणी त्‍यांना अटक करण्‍यात आली आहे.

Goa Rave Parties : वागातोर येथील अपघाताचा ‘रेव्ह पार्टी’शी संबंध असल्याचा स्थानिकांना संशय

स्थानिकांना ‘रेव्ह पार्ट्यां’ची आणि अमली पदार्थ व्यवहाराची माहिती मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? पोलीस निष्क्रीय आहेत ? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे ? कि त्यांचे ‘रेव्ह पार्ट्यां’चे आयोजन करणार्‍यांशी साटेलोटे आहे ?

International Drugs Racket Busted : मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाकडून अमली पदार्थ व्यवहाराचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त

मुंबई अमली पदार्थ पथकाने मिळालेल्या माहितीनुसार झांबियाचा नागरिक गिलमोरला मुंबईस्थित एका हॉटेलमध्ये कह्यात घेऊन त्याच्याकडून अमली पदार्थ कह्यात घेतले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कचरा जाळणार्‍यांच्‍या विरोधात तक्रार करण्‍याचे आवाहन !; २ कामगारांकडून ढाबामालकाची हत्‍या !…

दिवाळीनिमित्त बोनस (सानुग्रह अनुदान) देण्‍यास नकार दिल्‍याने २ कामगारांनी ढाबामालक राजू ढेंगर यांना मारहाण करून त्‍यांची हत्‍या केली. कामगारांनी गळा आवळून आणि चाकूने भोसकून हत्‍या केली.

ड्रग्ज आस्थापनाच्या पडताळणीत कसूर केल्याप्रकरणी पैठण येथील पोलीस निरीक्षकांचे स्थानांतर !

कामचुकार पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर न करता त्यांना कठोर शिक्षाच करायला हवी !