Gomantak Mahakavya : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘गोमांतक’ महाकाव्याचे कोकणीत रूपांतर – आज प्रकाशन

‘गोमांतक’ काव्याची पृष्ठभूमी पोर्तुगीज राजवटीच्या काळातील असून त्यात पोर्तुगीजांनी हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार आणि हिंदूंनी त्याविरुद्ध दिलेला चिवट लढा यांचे वर्णन केले आहे. हे महाकाव्य वर्ष १७३० नंतरच्या गोमंतकाच्या इतिहासावर आधारित आहे.

मुलांच्‍या संगोपनाच्‍या आव्‍हानांना तोंड देणे आणि सर्वांगीण विकास यांसाठी नूतन ग्रंथ साहाय्‍यक ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

कतरास (झारखंड) येथे ‘आदर्श अभिभावक कैसे बने ?’, या हिंदी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण

हिंदूंनो, हिंदुत्वाच्या हितासाठी स्वत: कार्य करा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

एक समाज असा आहे, जो आपले म्हणणे सरकारच्या गळी उतरवतो. सत्तेत हिंदू असूनही या लोकांच्या विचाराने सरकार चालते. आपला देश कुणी आतंकवादी चालवत नाहीत, तरीही हिंदुविरोधी भूमिका का घेतली जाते ? मंदिरांचे सरकारीकरण कुणी केले आहे ? सरकार मशिदी कह्यात का घेत नाहीत ?

डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हा देश सत्‍याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्‍यामुळे डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्‍पष्‍ट मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्‍यक्‍त केले.

‘गीता प्रेस’ केवळ मुद्रणालय नाही, तर श्रद्धास्थान ! – पंतप्रधान मोदी

विदेशी आक्रमणकर्त्यांनी आमची ग्रंथालये जाळली होती. इंग्रजांनी आमची गुरुकुल परंपरा नष्ट केली. आमचे पूजनीय ग्रंथ लोप पावण्याच्या स्थितीत होते. अशा वेळी गीता प्रेससारख्या संस्थांनी त्यांना वाचवण्याचे काम केले. हे ग्रंथ आज घरोघरी पोचले आहेत. या ग्रंथांशी आपल्या पुढच्या पिढ्या जोडल्या जात आहेत.

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन !

हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन !

वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये ‘ॲमेझॉन किंडल’वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

मनोज दाणीलिखित ‘अज्ञात पानिपत’ ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला !

सध्या इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. याला इतिहासप्रेमींनी विरोध करायला हवा. पानिपत हा मराठी माणसाच्या श्रद्धेचा विषय आहे.

परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांची अमृतत्वाकडे वाटचाल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि असा युगांचा क्रम असतो; परंतु जेव्हा व्यक्ती धर्माचरण किंवा साधना करते, तेव्हा ती हळूहळू मागील युगामध्ये म्हणजे परमात्म्याकडे प्रवास करते. या अमृत महोत्सवानिमित्त परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा द्वापरयुगाकडून सत्ययुगाकडे प्रवास करत आहेत, असे वाटते.

चेन्नई येथे तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

या कार्यक्रमाला ‘हिंदू मक्कल कत्छी’ चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘नॅशनल मिडिया पीपल वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. प्रकाश एम्. स्वामी आणि सरचिटणीस श्री. जयकृष्णन्, ‘विश्व हिंदु परिषदे’चे श्री. श्रीधरन् यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ नेते अन् प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.