कतरास (झारखंड) येथे ‘आदर्श अभिभावक कैसे बने ?’, या हिंदी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण
मुलांच्या चांगल्या व्यक्तीमत्त्वासाठी प्रार्थना करावी ! – पू. प्रदीप खेमकाया वेळी सनातन संस्थेचे पू. प्रदीप खेमका म्हणाले, ‘‘शास्त्रामध्ये बालकांना भगवान विष्णूचा अंश समजावे, असे म्हटले आहे. त्यांच्यासाठी शुक्ल पक्षातील चंद्रासारखी निरंतर वृद्धीसाठी आवश्यक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी अन् वाढत्या वयासह त्यांच्या मनात आई-वडील, नातेवाइक, तसेच शिक्षक यांच्याविषयी प्रेम अन् आदर वाढावा, यासाठी देवाला प्रार्थना करावी.’’ |
कतरास (झारखंड) – पालक होण्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नाही; पण चांगले पालक कसे व्हायचे ? हे शिकणे महत्त्वाचे आहे. ही एक कला आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमचा मुलगा एक आदर्श नागरिक बनून देशाला शांतता आणि समृद्धी यांच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. ‘आदर्श अभिभावक कैसे बने ?’ (आदर्श पालक कसे बनावे ?), हा ग्रंथ पालकांना आधुनिक जगात मुलांच्या संगोपनाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यास साहाय्य करील, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्गुरु नीलेश सिंंगबाळ यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कतरास येथील सरस्वती शिशु मंदिर, श्यामडीह येथे ‘आदर्श पालक कसे बनावे ?’, या विषयावर नुकतेच मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी सद़्गुरु नीलेश सिंंगबाळ यांच्या शुभहस्ते सनातनच्या ‘आदर्श अभिभावक कैसे बने ?’, या हिंदी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी कतरास येथील प्रसिद्ध उद्योजक, सरस्वती शिशु मंदिराचे अध्यक्ष तथा सनातन संस्थेचे पू. प्रदीप खेमका यांची वंदनीय उपस्थिती होती. या वेळी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी आहार, लस, खेळणी, पुस्तके, खेळ, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम यांची निवड कशी करावी ? मुलांना शिस्त कशी लावावी ? यांविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला शाळेचे सचिव श्री. विक्रम कुमार राजगडिया, प्राचार्य श्री. अभिमन्यू कुमार, समितीचे पूर्वोत्तर भारत आणि ईशान्य राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांच्यासह १ ली ते ६ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य श्री. अभिमन्यू कुमार आणि समितीचे श्री. शंभू गवारे यांनी केले.