पनवेल येथे ‘पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र’ चालू !

गिरीधर मूर्ती प्रशिक्षण आणि कलाकेंद्र, श्री गणेश कलाकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तीकारांनी सिद्ध केलेल्या मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला आणि नाशिवंत साहित्य आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना लागू रहाणार नाही.

गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमासह पारंपरिक वाद्यांवर भर द्यावा ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

गणेशोत्सव मंडळांनी आगामी गणेशोत्सव सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

गणेशोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर येथून २४५ एस्.टी. गाड्या जाणार ! – पंडित चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी

संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत येणार्‍या ८ ठिकाणांच्या अंतर्गत ४ ठिकाणी पहिल्या टप्प्यात ही उभारणी करण्यात येत आहे. यानंतर कन्नड आणि गंगापूर येथे उभारण्यात येणार आहे.

सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

वाचक, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी हिंदू यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !

गणेशोत्सव मिरवणुकीवर घातलेले निर्बंध शिथिल करा ! – शिवसेना शिष्टमंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

श्री गणेशचतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या दिवशी मिरवणुका काढण्याची अनुमती मंडळांना दिली जाणार आहे. इतर दिवशी विनाअनुमती मिरवणूक काढल्यास मंडळांवर गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करण्याची चेतावणी पोलीस प्रशासनाने दिली आहे.

दहीहंडी उत्सवातील विज्ञापनांना शुल्क सवलत नाही ! – डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त

आगामी गणेशोत्सवासाठी मंडळांकडून उभारण्यात येणार्‍या स्वागत कमानी, कमानींवरील विज्ञापने यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तसेच दहीहंडी उत्सवातील विज्ञापनांना शुल्कात सवलत नसल्याचे पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.

Ganeshotsav 2024 : नाशिक येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सिद्ध करणार्‍या ७ मूर्तीकारांवर कारवाई !

मूर्तीकारांना शाडूची माती मुबलक प्रमाणात उपलब्ध करून न देता मूर्तीकारांवर थेट कारवाई करणे कितपत योग्य ?

नागपूर येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती आढळल्यास १० सहस्र दंड !

महापालिकेने शास्त्रानुसार शाडूच्या अल्प फूट उंचीच्या मूर्ती वापरण्याविषयी नागरिकांचे प्रबोधन केले पाहिजे !

साधकांना सूचना : श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !

बरेच उद्योगपती आणि विक्रेते श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने इतरांना भेटवस्तू देतात. त्यासाठी ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे आकर्षक भेटसंच बनवून त्यांना वितरित करू शकतो.’