Ganeshotsav 2024 : नाशिक येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सिद्ध करणार्‍या ७ मूर्तीकारांवर कारवाई !

नाशिक : येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती सिद्ध केल्या म्हणून ७ मूर्तीकारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी १० सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सिद्ध करणार्‍या मूर्तीकारांवर कारवाई करणे चालू केले आहे. ‘नागरिकांमध्ये जागरूकता यावी’, यासाठी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

नागपूर महापालिकेनेही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सिद्ध केल्यास १० सहस्र रुपये दंड आकारण्याची चेतावणी दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • प्रदूषणाविषयी एवढ्या सतर्क असणार्‍या महानगरपालिका अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी, तसेच कारखान्यांकडून सर्व नद्यांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत ?
  • मूर्तीकारांना शाडूची माती मुबलक प्रमाणात उपलब्ध करून न देता मूर्तीकारांवर थेट कारवाई करणे कितपत योग्य ?