सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. येथील अलंकार सभागृहामध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत महत्त्वाच्या दिवशी मद्य आणि माडी विक्री बंद रहाणार !

गणेशोत्वसाच्या कालावधीत तीन महत्त्वाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी, तसेच विदेशी मद्य आणि माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद रहातील-जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

महाराष्ट्रात कार्यान्वित न झालेले ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर’ तातडीने चालू करा !

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि औद्योगिक केंद्र असणार्‍या माणगावातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू झालेले नाही.

गणेशोत्सव मंडळांना उत्सवासाठी ५ वर्षांची अनुमती मिळणार !

मंडळांनीही योग्य प्रतिसाद द्यावा. वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. मूर्ती विसर्जन करतांना उत्सवाचे पावित्र्य राखले जाईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये सातारा पोलीस दलाने सतर्कता बाळगावी ! – शंभूराज देसाई

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी आतापासून बैठका घ्या. जे गुन्हेगार सतत गुन्हे करत आहेत, अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.

खामगाव (बुलढाणा) येथे गणेशोत्सवकाळात ‘डीजे’ वाजवण्यास अनुमती नाही !

उत्सवकाळात डीजेमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवू नये, तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करावे. डीजेऐवजी मिरवणुकीत ढोल-ताशे, बँड-बाजा अशा प्रकारच्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.

गणेशोत्सवात आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेची चेतावणी !

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद नष्ट करण्यासाठी प्रभावी पावले न उचलल्याने हिंदूंचे सण आणि उत्सव आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करण्याची लाजिरवाणी स्थिती ओढवली आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

गणेशोत्सव जवळ आला असतांना १३ पूल धोकादायक असल्याची दिली चेतावणी !

केवळ नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करून प्रशासनाचे दायित्व संपत नसते. मुळात ‘गणेशोत्सवापूर्वीच धोकादायक पुलांची कामे का झाली नाहीत ?

‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अभियानाला चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथून प्रारंभ !

असे अभियान राबवण्याचा निश्‍चय करणारे व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे अभिनंदन ! 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहतुकीस बंद

सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे, त्यामुळे जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव संपेपर्यंत हा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद असेल.