Hamas Supporter : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याला अनुमती देण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नकार !

बॅट आणि बूट यांवर गाझाच्या समर्थनार्थ ‘लोगो’ लावण्याविषयी केली होती मागणी

उस्मान ख्वाजा (डावीकडील) यांनी आयसीसीवर दुटप्पीपणाचा आरोप केला

सिडनी (ऑस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याने त्याची बॅट आणि बूट यांवर गाझाच्या समर्थनार्थ ‘लोगो’ (चिन्ह) लावण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’कडे (आयसीसीकडे) अनुमती मागितली होती. ‘आयसीसी’ने ही अनुमती नाकारली आहे. उस्मान ख्वाजा याने याला ‘आयसीसी’चा दुटप्पीपणा म्हटले आहे.

१. काही दिवसांपूर्वी क्रिकेट सामन्याच्या वेळी पॅलेस्टाईनचे समर्थन करणारे फलक लावणार्‍या पाकिस्तानी चाहत्यांना ऑस्ट्रेलियातील पर्थ मैदानातून बाहेर काढण्यात आले होते.

२. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाने यापूर्वी त्याच्या बुटांवर गाझाचे समर्थन करणारा एक संदेश लिहिला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर त्याने  ‘आयसीसी’ला गाझाच्या समर्थनार्थ त्याच्या बॅट आणि बूट यांवर चिन्ह वापरण्यासाठी अनुमती देण्याची विनंती केली होती.

३. आयसीसीने याला नकार दिल्यानंतर उस्मान ख्वाजा याने ‘आयसीसी’ वर टीका करणारा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे. यामध्ये ‘दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराज यांच्या बॅटवर ‘ओम’ चिन्ह आहे. त्याचप्रमाणे निकोलस पूरन आणि इतर काही फलंदाज यांच्या बॅटवर वेगवेगळी धार्मिक चिन्हे आहेत’, असे सांगण्यात आले आहे. यावरून ‘त्यांना विरोध झाला नाही; मात्र मला विरोध होत आहे’, असे ख्याजा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील किती हिंदु क्रिकेटपटू काश्मीर अथवा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथे झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराविषयी बोलतात किंवा त्याचा सार्वजनिकरित्या विरोध करतात ?