३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ९२ पदक विजेत्यांमध्ये केवळ २८ मूळ गोमंतकीय खेळाडू

पणजी, १२ नोव्हेंबर (वार्ता.) : गोव्यात नुकत्याच झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याने चांगली कामगिरी बजावून एकूण ९२ पदके मिळवली आहेत. हे आतापर्यंतच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील गोव्याचे सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन आहे; मात्र यंदाच्या स्पर्धेत गोव्याकडून खेळलेल्या गोव्याच्या एकूण पदक विजेत्यांमध्ये केवळ ३०.४३ टक्के खेळाडूच मूळ गोमंतकीय होते. ९२ पदकांपैकी केवळ २८ पदके मूळ गोमंतकीय खेळाडूंनी जिंकली आहेत, तर उर्वरित पदके गोव्याकडून खेळणार्‍या इतर राज्यांतील खेळाडूंनी मिळवली आहेत.

राज्यातील सर्व मैदाने स्वच्छतेनंतर लगेच खेळाडूंसाठी उपलब्ध होणार ! – क्रीडामंत्री गोविंद गावडे

क्रीडामंत्री गोविंद गावडे

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी सकाळी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वापरल्या गेलेल्या फोंडा येथील मैदानाच्या स्वच्छतेसंबंधी पहाणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले, ‘‘स्वच्छता झाल्यानंतर राज्यातील सर्व मैदाने खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहेत.’’