३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेची आज होणार भव्य सांगता !

‘‘समारोप सोहळ्याला आज दुपारी २.३० वाजता प्रारंभ होणार आहे. दुपारी ३.४५ वाजता उपराष्ट्रपतींचे मैदानात आगमन होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेतील उत्कृष्ट पुरुष आणि उत्कृष्ट महिला खेळाडू, सर्वाधिक पदके प्राप्त केलेला खेळाडू यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.’’

Gavaskar Tricolour Defaced : क्रिकेट सामन्याच्या वेळी राष्ट्रध्वजाची विटंबना झाल्यावरून सुनील गावस्कर यांनी घेतला आक्षेप !

जागतिक स्तरावरील क्रिकेट सामन्यात अशा प्रकारची राष्ट्रनिष्ठा दाखवणे हे वाखाणण्यासारखेच आहे. याबद्दल गावस्कर यांचे अभिनंदन !

गोव्याला ‘पेंचाक सिलाट’ या क्रीडा प्रकारात मिळाले दुसरे सुवर्ण

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान गोव्याच्या करिना शिरोडकर हिने ‘पेंचाक सिलाट’ या क्रीडा प्रकारात जम्मू-काश्मीरच्या जिया चौधरी हिचा ३०-१५ गुणांच्या फरकाने पराभव करत..

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नौका क्रीडा प्रकार होण्यासाठी सरकारला स्थानिक शेतकर्‍यांनी केले साहाय्य

स्पर्धेत वापरत असलेल्या नौका ठेवणे आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागा देणे, यांसाठी स्थानिक शेतकर्‍यांनी साहाय्य केले आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धांतील घटनांचे जागतिक पडसाद आणि भारताकडून अपेक्षित असणारी राष्ट्रहितैषी भूमिका !

देशात पाक आणि बांगलादेश येथून मुसलमानांकडून भारतात शिरणार्‍या घुसखोरांची संख्या पुष्कळ आहे. क्रिकेट सामन्याचे कारण देऊन भारतात घुसखोरांच्या माध्यमातून आतंकवादीही घुसू शकतात.

उद्या पणजी, वास्को आणि मडगाव रस्त्यांवरील वाहतुकीत मोठे पालट

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे फातोर्डा मैदानात २६ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी पणजी, वास्को आणि मडगाव रस्त्यांवरील वाहतुकीत मोठे पालट करण्यात आले आहेत.

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी गोवा सिद्ध !

उद्घाटन सोहळ्याला राज्यभरातून १२ सहस्र लोकांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये ५ सहस्र शालेय विद्यार्थी, तसेच स्पर्धेत सहभाग घेणारे खेळाडू आणि इतर पदाधिकारी यांचा समावेश असणार आहे.

खेळाचे इस्लामीकरण करू नका ! – अधिवक्ता विनीत जिंदाल, सर्वोच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘पाकिस्तानी क्रिकेटरद्वारे जिहादला समर्थन !’, या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील घटनांचे जागतिक पडसाद आणि भारताकडून अपेक्षित असणारी राष्ट्रहितैषी भूमिका !

पाक खेळाडू सामन्यांच्या काळात भारतीय खेळाडूंना घायाळ किंवा त्यांना गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक पाकिस्तानी खेळाडू हा भारताविरुद्ध खेळतांना हिंदुद्वेषी आणि जिहादी मानसिकतेतूनच खेळत असतो.

क्रिकेटपटू रिंकू सिंह यांनी बांधले कुलदेवीचे मंदिर !

सिंह यांच्या कुटुंबाची कुलदेवता श्री चौदेरेदेवी आहे. इंडियन क्रिकेट लीग अर्थात् ‘आय.पी.एल्.’ आणि भारतीय क्रिकेट संघात खेळतांना चांगली कामगिरी व्हावी, यासाठी त्यांनी कुलदेवीकडे आशीर्वाद मागितले होते.