आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या ‘टीझर’मध्ये सीतामातेच्या पात्रावरूनही टीका

केवळ चांगला अभिनय आणि आधुनिक तंत्रज्ञान यांमुळे नव्हे, तर देवतांचे रूप साकारतांना त्यांच्याविषयी भाव असणे आवश्यक आहे !

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला ! – श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांची मागणी

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या रामायणावर आधरित चित्रपटाचा टीझर (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर टीका होत आहे. याविषयी आता अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनीही टीका करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळले नाही, तर कायदेशीर कारवाईचा विचार करू !

जर ‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यात आली नाहीत, तर चित्रपटावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.

मोहनदास गांधी यांच्या हत्येवर ‘बुलेट’ नावाचा चित्रपट येणार !

म. गांधी यांच्यावर ३ गोळ्या झाडण्यात आल्याचे म्हटले जाते. प्रत्यक्षात त्यांच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. ही चौथी गोळी पंडित नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून सुटलीच नव्हती.

साधू-संतांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !

याला चित्रपटसृष्टीही कारणीभूत ! काही चित्रपटांमध्ये तर साधू-संत यांना गुंड-माफिया असेही दाखवण्यात आले आहे. सातत्याने दाखवण्यात येणार्‍या अशा नकारात्मक भूमिकांमुळे समाजमनाचीही भगवे कपडे घातलेल्यांविषयी अयोग्य प्रतिमा अगोदरच सिद्ध झाली आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती वाढत आहे.

पारंपरिक पोशाखातील महिलांना समुद्रकिनार्‍यावर मद्याच्या बाटल्यांसह दाखवलेले ‘जहाँ चार यार’ या चित्रपटाचे आक्षेपार्ह पोस्टर प्रदर्शित !

भारतीय कुटुंबव्यवस्थेवर आघात करणारेे आणि चंगळवादाला प्रोत्साहन देणारे असे चित्रपट भारतियांनी स्वत:चे पैस व्यय करून का पहावे ?

हिंदी चित्रपटसृष्टीची स्थिती दयनीय ! – चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आजकाल गुटखा विकत आहेत. त्यांना मोकळा वेळ मिळाला की, ते काही विनोदी किंवा अन्य विषयांवर चित्रपट बनवतात. ५-६ चित्रपट अपयशी ठरल्यानंतरही त्यांना काही फरक पडत नाही. ही खरोखरच दयनीय स्थिती आहे.

चित्रपटातील तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखण्याचा आरोप करत प्रसंग गाळण्याचा केरळ चित्रपट मंडळाचा आदेश ! – चित्रपट दिग्दर्शक रामसिम्हन्

केरळच्या साम्यवादी आघाडी सरकारच्या अखत्यारीत असलेले चित्रपट मंडळ याहून वेगळे काय करणार ? जो इतिहास आहे तो जगासमोर आलेलाच आहे, तो आता चित्रपटातून येऊ नये म्हणून आटापिटा करणारे केरळ सरकार किती धर्मांधप्रेमी आणि हिंदुविरोधी आहे, हे लक्षात घ्या !

चुकीच्या ट्वीटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड तोंडघशी पडले !

भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटापेक्षा त्यांनी बहिष्कार घातलेल्या ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाने जास्त पैसे कमावले. ७.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे साधारण ६,००० कोटी रुपये ! भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे

भूतकाळातील वक्तव्यांचा त्रास तुम्हाला नक्कीच भोगावा लागेल ! – अनुपम खेर, अभिनेते

जर तुम्ही भूतकाळात काही म्हणाला असाल, तर त्याचा त्रास तुम्हाला वर्तमान स्थितीत नक्कीच भोगावा लागेल, असे विधान अभिनेते अनुपम खेर यांनी केले.