भूतकाळातील वक्तव्यांचा त्रास तुम्हाला नक्कीच भोगावा लागेल ! – अनुपम खेर, अभिनेते

अभिनेते आमीर खान यांचा ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपट अपयशी ठरल्याचे प्रकरण

अनुपम खेर (डावीकडे) आणि आमीर खान

मुंबई – जर तुम्ही भूतकाळात काही म्हणाला असाल, तर त्याचा त्रास तुम्हाला वर्तमान स्थितीत नक्कीच भोगावा लागेल, असे विधान अभिनेते अनुपम खेर यांनी केले. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना त्यांनी हे वक्तव्य केले. वारंवार हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी भूमिका घेणारे आमिर खान यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आले होते. त्यामुळे हा चित्रपट अपयशी ठरला. त्या पार्श्‍वभूमीवर अनुपम खेर यांनी वरील विधान केले.