चुकीच्या ट्वीटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड तोंडघशी पडले !

चित्रपटाच्या कमाईत ६० कोटी रुपयांऐवजी ६,००० कोटी रुपयांचा उल्लेख

डॉ. जितेंद्र आव्हाड

मुंबई – भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटापेक्षा त्यांनी बहिष्कार घातलेल्या ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाने जास्त पैसे कमावले. ७.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे साधारण ६,००० कोटी रुपये ! भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. ‘हॅशटॅग फेक बॉयकॉट’, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले होते; पण त्यात त्यांनी एक मोठी चूक केली होती. ट्वीटमध्ये त्यांनी ‘७.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ६००० कोटी रुपये’, असे नमूद केले होते. प्रत्यक्षात ते ते केवळ ६० कोटी रुपये होतात. चूक लक्षात आल्यावर त्यांनी ट्वीट लगेच काढून टाकले (डिलीट केले). चुकीच्या ट्वीटमुळे सामाजिक संकेतस्थळावर अनेकांनी त्यांना विरोध केला. (‘द कश्मीर फाइल्स’ या राष्ट्रप्रेमी चित्रपटाला मिळालेले यश पचनी न पडल्याने त्या द्वेषापोटी विधाने करू पहाणार्‍या आव्हाडांना त्यांचा आततायीपणा चांगलाच भोवला !’, असे म्हणता येईल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

तीन शून्यांचा अर्थ आमदारांना न समजणे लज्जास्पद नव्हे का ?