मुंबई, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – दशग्रंथी ब्राह्मण असलेल्या रावणाला मोगल आक्रमकाप्रमाणे दाखवण्यात आल्यामुळे आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर टीका होत आहे. याच चित्रपटाच्या ‘टीझर’मध्ये (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) सीतामातेलाही आधुनिक अभिनेत्रीप्रमाणे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या जगविख्यात मालिकेशी तुलना करून या चित्रपटाच्या ‘टीझर’वर सामाजिक माध्यमांवरून टीका करण्यात येत आहे.
Mukesh Khanna on Adipurush teaser: ‘Hindu Gods are not handsome like Schwarzenegger, they are beautiful’https://t.co/dtg9gCylWe
— HT Entertainment (@htshowbiz) October 5, 2022
अनेकांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील माता सीता, प्रभु श्रीराम, हनुमंत, रावण या पात्रातील वेशभूषेची तुलना ‘आदिपुरुष’ चित्रपटातील त्या पात्रांशी केली आहे. ‘टीझर’मधील सीतामातेचा शृंगार हा आधुनिक पद्धतीचा आहे. साडी नेसण्याची पद्धत शालीनता दाखवणारी नाही. प्रभु श्रीराम, सीतामाता, मारुति या पात्रांच्या अभिनयातून देवतांविषयी भाव उत्पन्न होण्याऐवजी केवळ मनोरंजनाचा अनुभव येत आहे. चित्रपटाला ‘ग्लॅमर’चे रूप देतांना रामायणातील मूळ अध्यात्माचा गाभा मात्र हरवून गेला आहे.
संपादकीय भूमिका
|