दिन दिन दिवाळी

भारतातील प्रत्येक कोपर्‍यात दिवाळीचे रंग वेगळेच आहेत. दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये दिवाळी हा सण ‘नरकचतुर्दशी’ म्हणून साजरा केला जातो.

शौर्याचे धडे देणारी गड (किल्ले) बांधण्याची परंपरा जोपासा ! 

हल्ली अनेक ठिकाणी गड बांधण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात मुलांना अवश्य भाग घ्यायला लावा. त्यानिमित्ताने त्यांचे कुतूहल चाळवेल, इतिहास वाचला जाईल, तसेच नवनिर्मितीचा आनंद मिळेल.

अभ्यंग स्नान !

दिवाळीत पहिली अंघोळ अर्थात् अभ्यंगस्नानासाठी आपण निरनिराळी उटणे किंवा प्रचलित विज्ञापनांतील साबण, सुगंधी तेल, सुगंधी अत्तर यांची खरेदी करतो; मात्र शास्त्रानुसार सुगंधी आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर असलेले उटणे वापरणे सर्वाधिक हितावह ठरते.  

अभ्यंगस्नानाचे महत्त्व !  

पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान ! स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृतावस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. त्यामुळे या पोकळ्या चैतन्य ग्रहण करण्यासाठी संवेदनशील बनतात.

लक्ष्मीपूजन कधी आणि कोणत्या दिवशी करावे ?

लक्ष्मीपूजन हे प्रदोषकाळी, म्हणजेच सूर्यास्ताच्या नंतर करावे; पण प्रत्येक गावातील आणि शहरातील सूर्याेदय अन् सूर्यास्त यांच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने कोणत्या गावी आणि शहरी कोणत्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे, हे पुढे देत आहोत…

नरकचतुर्दशी !

आश्विन कृष्ण चतुर्दशीस ‘नरकचतुर्दशी’ म्हणतात. सर्वांना पिडणार्‍या नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी संहार केला. म्हणून या तिथीला ‘नरकचतुर्दशी’ हे नाव पडले.

इतिहासातील दिवाळी !

भारतात दिवाळीचा सण हा पुष्कळ पूर्वीपासून साजरा केला जात आहे. ‘दीपोत्सव’ अशा सणाचे संदर्भ पुराणकथांमध्येही आढळून येतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. पेशवेकाळासह संतपरंपरेतही या सणाचे संदर्भ सापडतात.

‘आमची दिवाळी…हलालमुक्त दिवाळी !’

राष्ट्रप्रेमासाठी ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करूया ! वस्तूवर हलाल प्रमाणपत्राचे चिन्ह नाही ना ? हे पडताळून मगच वस्तू घ्या !

भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भाऊबिजेच्या दिनी आपल्या बहिणीला वरील अशाश्वत भेटवस्तू देण्यापेक्षा चिरंतन ज्ञानाचा प्रसार करणार्‍या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथ भेट देता येतील. त्याचप्रमाणे तिला ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकाची वाचिकाही बनवता येईल. सध्याच्या काळानुसार ही भेट देणे अधिक सयुक्तिक ठरेल.

संपादकीय : हिंदूंना वाली कोण ?

सरकारने शिक्षण सुधारण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू केले असले, तरी अशा सुधारणा करण्याच्या पलीकडे गेलेल्या विद्यािपठांचे काय ?, हा प्रश्न उतरतोच ! याचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे त्यांना टाळे ठोकणे. यातच देशहित आहे.