यमदीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय तर टळतेच आणि मृत्यूनंतर सद्गती लाभते !
‘सुखाने प्रवास करतांना रूपाला धक्का न लागता म्हणजेच थोडेही न खरचटता झालेला प्रवास तो सुखरूप प्रवास !’ येतांना जेवढी काळजी तेवढीच जातांनाही काळजी घेणे महत्त्वाचे ! देह संपेल; पण आत्म्याला सद्गती लाभावी; म्हणूनही धर्मशास्त्राने दूरदृष्टीने विचार करून ठेवला आहे.