रासायनिक शेती केवळ मानवी आरोग्याची नाही, तर निसर्गाचीही मोठी हानी करते !
‘रासायनिक शेतीतील पिके मानवी आरोग्यासाठी हानीकारक आहेतच; परंतु ही रसायने शेतातील अनेक सूक्ष्म जीव-जंतू, पाणी आणि हवा यांचीही हानी करतात. रसायनांच्या सततच्या वापराने मातीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणू मरतात आणि भूमीची सुपीकता घटत जाऊन ती नापीक होते.